मृत्यूच्या तब्बल 15 वर्षानंतर केले अत्यसंस्कार

मृत्यूच्या तब्बल 15 वर्षानंतर केले अत्यसंस्कार

बीजिंग : चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचे सुधारणावादी नेते झाओ झियांग यांचा 15 वर्षापूर्वी मृत्यू झाला होता, त्यांच्यावर शुक्रवारी अत्यसंस्कार करण्यात आले. 1989 मध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकारने सशस्त्र पणे दडपून टाकण्याचा प्रयत्न केला होता. याला झियांग यांनी निषेध दर्शविला होता. ज्यामुळे त्यांना सरकारने हद्दपार केले होते. त्यामुळेच त्यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांच्यावर रीतीप्रमाणे अत्यसंस्कार करण्यात आले नव्हते. 

झियांग यांचा जन्म 1919 मध्ये चीनच्या हेनान प्रातांत झाला होता. दरम्यान सुरुवातीपासूनच झियांग हे अनेक  राजकीय चळवळीत सक्रीयहोते. त्यात 1989 मधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकारने दडपून टाकण्याच्या केलेल्या प्रयत्नामुळे त्यांना तत्कालीन सरकारने हद्दपार केले होते. 

तसेच चीनच्या सर्व प्रकारच्या इतिहासातून आणि बातम्यातूनही त्यांचा उल्लेख वगळण्यात आला होता. 2005 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर केवळ एक संक्षिप्त पत्रक देण्यात आले होते. ज्यात त्यांनी 1989 मध्ये अनेक चूका केले असल्याचे सरकारने नमूद केले होते. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या कोणत्याच गुन्ह्यांची कबूली अखेरपर्यंत दिली नसल्याने शेवटची 16 वर्षे त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com