फेसबुकवरून 'लाईव्ह' केला सामूहिक बलात्कार

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जानेवारी 2017

स्टॉकहोल्म (स्विडन)- सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकवरून 'लाईव्ह' सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (मंगळवार) दिली.

स्टॉकहोल्म (स्विडन)- सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकवरून 'लाईव्ह' सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (मंगळवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर स्टॉकहोल्म पासून 70 कि.मी. अंतरावर असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये रविवारी (ता. 22) ही घटना घडली. एका 30 वर्षीय महिलेवर 18, 20 व 24 वर्षाच्या तीन युवकांनी फेसबुकरून 'लाईव्ह' बलात्कार सुरू केला. फेसबुकच्या या ग्रपवर 60 हजार सदस्य जोडले गेले आहेत. संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत होता. यामुळे संबंधित घटनेची माहिती एकाने पोलिसांना कळविली होती. या घटनेचा शोध घेतल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, फेसबुकवरून संबंधित व्हिडिओ व छायाचित्रे काढून टाकण्यात आली आहेत.

Web Title: Gang Rape In Sweden Streamed Live On Facebook