पाकिस्तानला मूलतत्त्ववाद्यांचा धोका अधिक- बाज्वा

वृत्तसंस्था
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

बाज्वा हे 1982 मध्ये पाकिस्तानच्या सैन्यात दाखल झाले. सर्वोत्तम अधिकाऱ्यांमध्ये बाज्वा यांची गणना होते.

इस्लामाबाद - भारतापेक्षा पाकिस्तानला मूलतत्त्ववाद्यांचा धोका अधिक आहे. हा धोका कमी करण्यासाठी प्रयत्न करू, असे वक्तव्य पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल कमार जावेद बाज्वा यांनी केले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी लेफ्टनंट जनरल बाज्वा यांची पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. सध्याचे लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ हे मंगळवारी (ता. 29) निवृत्त होत आहेत. त्यानंतर बाज्वा पदाची सूत्रे स्वीकारतील. सध्या ते पाकिस्तान सैन्याच्या प्रशिक्षण विभागाचे महानिरीक्षक आहेत. 

बाज्वा हे 1982 मध्ये पाकिस्तानच्या सैन्यात दाखल झाले. सर्वोत्तम अधिकाऱ्यांमध्ये बाज्वा यांची गणना होते. भारत आणि पाकिस्तानमधील नियंत्रण रेषेवर संरक्षणाची जबाबदारी असलेल्या तुकडीची जबाबदारीही बाज्वा यांनी सांभाळली आहे. याशिवाय गिलगीट-बाल्टिस्तान भागातही त्यांनी मेजर जनरल म्हणून काम केले आहे.

Web Title: General Qamar Javed Bajwa appointed 16th Army Chief of Pakistan