पॉप गायक जॉर्ज मायकल यांचे निधन

वृत्तसंस्था
सोमवार, 26 डिसेंबर 2016

जॉर्जने 1980 मध्ये शाळकरी मित्र ऍण्ड्यू रिजेले याच्या साथीने 'व्हाम' हा बँड सुरु केला. या बँडच्या 'केयरलेस व्हिस्पर' अल्बमला जगभरातून खूप प्रसिद्धी मिळाली. या अल्बमच्या तब्बल 60 लाख कॉपी विकल्या गेल्या.

लंडन - 'व्हाम' या अल्बममुळे जगभरात प्रसिद्ध असलेला ब्रिटनचा पॉप गायक जॉर्ज मायकल (वय 53) यांचे रविवारी निधन झाले.

जॉर्ज यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले, की आम्हाला सांगण्यास दुःख होते ख्रिसमसच्या दिवशीच जॉर्जने अखेरचा श्वास घेतला. आपल्या सगळ्यांचा लाडका पुत्र, भाऊ आणि मित्र जॉर्जचे निधन झाल्याची माहिती कळवताना आम्हाला अतिशय दु:ख होते आहे. जॉर्जच्या कुटुंबीयांची इच्छा आहे, की या कठीण काळात सर्वांनी त्यांच्यासोबत असावे.

जॉर्ज मायकल यांना सुरवातीपासूनच गायनात खूप आवड होती. जॉर्जिओस किरियाकोस पनाईओटोऊ असे त्यांचे पूर्ण नाव होते. जॉर्जने 1980 मध्ये शाळकरी मित्र ऍण्ड्यू रिजेले याच्या साथीने 'व्हाम' हा बँड सुरु केला. या बँडच्या 'केयरलेस व्हिस्पर' अल्बमला जगभरातून खूप प्रसिद्धी मिळाली. या अल्बमच्या तब्बल 60 लाख कॉपी विकल्या गेल्या. मात्र, या दोघांची जोडी जास्त दिवस टिकू शकली नाही. रिजेलेपासून वेगळे झाल्यानंतर जॉर्जने 1987 मध्ये 'फेथ' हा अल्बम नागरिकांच्या पसंतीस उतरला. जॉर्जला दोनवेळा ग्रॅमी पुरस्कारही मिळाला होता. तसेच जॉर्जच्या जीवनावर आधारित 'अ डिफरेंट स्टोरी' हा चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.

Web Title: George Michael, British pop singer dies at 53