डोळ्यांत अश्रू येतील; वडिलांचं हेल्मेट घालून चिमुकली पोहोचली अंत्ययात्रेत

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 जानेवारी 2020

शार्लोटने शेवटी आपल्या वडिलांच्या शवपेटीचे चुंबन घेतले. आणि त्यांना अखेरचा निरोप दिला.

मेलबर्न : गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या वणव्यात निसर्गाची मोठी हानी झाली. यावेळी लागलेल्या आगीत 23 जणांचा बळी गेला असून जीव गमवावा लागलेल्या पक्षी आणि प्राण्यांची संख्या ही 50 कोटींच्या घरात आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या कांगारु आणि कोआला यांची संख्या सर्वाधिक आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आग विझविण्यासाठी राबविण्यात आलेल्या ऑपरेशन दरम्यान अग्निशमन दलाच्या 23 जवानही शहीद झाले. त्यापैकी काहीजणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. न्यू साऊथ वेल्स येथे आयोजित करण्यात आलेल्या या अंत्यसंस्कार कार्यक्रमावेळी एका लहान चिमुरडीने सर्वांचेच लक्ष्य वेधून घेतले आहे. 

Image may contain: 3 people, people standing

सिडनीच्या नैऋत्येला असलेल्या जंगलात आग विझविताना एक झाड ट्रकवर कोसळल्याने अँड्र्यू ओ’डव्हायर आणि जॉफ्री कीटन यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हा अंत्यसंस्काराचा कार्यक्रम जे हॉर्सली पार्कमधील लेडी ऑफ व्हिक्टरीज कॅथलिक चर्च येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी अँड्र्यूची पत्नी मेलिसा, पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, न्यू साउथ वेल्सचे ग्लेडिस बेरेजिकलियन आणि शेकडो स्थानिक उपस्थित होते. 

- स्टीफन हॉकिंग आणि त्यांचे लखनौ कनेक्शन...

आग विझवताना शहीद झालेल्या अँड्र्यू ओ’डव्हायर यांना अंतिम निरोप देण्यासाठी त्यांची दीड वर्षाची लहान मुलगी या कार्यक्रमासाठी आली होती. पांढऱ्या रंगाची फ्रॉक घातलेली ही चिमुकली आपल्या वडिलांच्या कासकेटशेजारी उभी राहिली होती. डोक्यावर वडिलांचे हेल्मेट आणि छातीवर त्यांना बहाल करण्यात आलेले शौर्य पदक पाहून अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.

Image may contain: 3 people, people sitting and child

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, शार्लोट असं या चिमुकलीचं नाव आहे. अँड्र्यू यांच्या पार्थिवाशेजारी त्यांचे हेल्मेट ठेवण्यात आले होते. मात्र, ते हेल्मेट या चिमुकलीनं आपल्या डोक्यावर परिधान केले. आणि त्याच ठिकाणी बराच वेळ उभी राहिली. आपले वडील शहीद झाले आहेत, हे न कळण्याचं तिचं वय.

- Australia Fire : दोन वर्षाच्य़ा चिमुकल्याने स्विकारलं वडिलांचे शौर्य पदक; पाहा फोटो !

शार्लोटने शेवटी आपल्या वडिलांच्या शवपेटीचे चुंबन घेतले. आणि त्यांना अखेरचा निरोप दिला. तिच्या या कृतीमुळे चर्चमध्ये उपस्थित असलेल्या अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. ऑस्ट्रेलियातीलच नव्हे, तर जगभरातील नेटीझन्सही तिचा हा फोटो पाहून गहिवरुन गेले आहेत. 

Image may contain: 6 people, people standing

अँड्र्यूला निरोप देण्यासाठी आरएफएसचे अनेक जवान हजर होते. जवानांनी त्याला चर्चबाहेर 'गार्ड ऑफ ऑनर'ही दिला. यावेळी आरएफएसचे कमिशनर शेन फिटझिमन्स यांनी शार्लोटला सांगितले की, ''2003 मध्ये सेवेत रुजू झालेल्या तुझे वडिलांचा आम्हाला अभिमान आहे. आणि तुझ्या छातीवर असलेले शौर्य पदक आम्हाला याची कायम आठवण देत राहील."

- इराणचा पुन्हा रॉकेट हल्ला; इराकमधील अमेरिकेन दूतावासावर सोडले रॉकेट

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या वणव्यात भरून न निघणारे नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. वणव्यात जीव गमवावा लागलेल्या प्राण्यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यानंतर या चिमुकलीचा फोटोही प्रचंड व्हायरल होत आहे. 

Image may contain: 3 people, people smiling, close-up and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl wears her Australian Firefighter dads helmet at his funeral