मांजरासाठीच्या फूड पॅकेटमध्ये गर्लफ्रेंडला सापडला स्पाय कॅमेरा | Hidden Camera | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girlfriend got hidden Camera in Food packet
मांजरासाठीच्या फूड पॅकेटमध्ये गर्लफ्रेंडला सापडला स्पाय कॅमेरा | Hidden Camera

मांजरासाठीच्या फूड पॅकेटमध्ये गर्लफ्रेंडला सापडला स्पाय कॅमेरा

ऑनलाइन रिटेल वेबसाइटवरून (Online retail websitea) वस्तू ऑर्डर (Order) केल्यावर अनेकदा गोंधळ झाल्याचं दिसून येते. आपण मागवतो एक वस्तू आणि आपल्याला मिळते दुसरंच काहीतरी. पण कधी कधी दुकानातून वस्तू घेतल्यावरही असे प्रसंग घडत असतात. एका व्यक्तीने आपल्या मांजरीसाठी विकत घेतलेल्या अन्नामध्ये छुपा कॅमेरा (Hidden camera)असल्याचे लक्षात आलं.

प्रेयसीला सापडला छुपा कॅमेरा (Sweetheart found a hidden camera)-

ही घटना दक्षिण लंडनमधील (South London) आहे. या व्यक्तीने त्याच्या दोन मांजरींसाठी (Bought food Packet fro cat) एका दुकानातून अन्न विकत घेतले होते. लिलीपुट आणि गोलियाथ ही त्याच्या मांजरींची नावे आहेत. मात्र जेव्हा त्याच्या प्रेयसीने घरी येऊन हे फूड पॅकेट उघडले तेव्हा तिला धक्काच बसला. तिने पाहिलं की, पॅकेटमध्ये एक स्पाय कॅमेरा होता. इतकेच नाही तर त्यात ट्रान्समीटरही होता. तिने लगेचच या कॅमेराचे फोटो काढून घेतले.

हेही वाचा: Viral Video: ट्रेनची वासराला धडक; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल

पॅकेटमध्ये लपवला होता कॅमेरा (The camera was hidden in the packet)-

त्या व्यक्तीने त्याचे नाव मीडियासमोर उघड केले नाही, परंतु या पॅकेटचा फोटो मात्र शेअर केला. पॅकेटच्या वरच्या बाजूला मांजरीचे चित्र असल्याचं दिसत आहे. या चित्रात मांजरीच्या डोक्यावर तिसरा डोळा दिसत आहे. पण तो डोळा नसून एक इंटेलिजन्स कॅमेरा होता. त्याने वेलकम स्टोअरमधून हा बॉक्स खरेदी केल्याचे सांगितले.

हेही वाचा: VIDEO: बुलेटवर हवा करणाऱ्यांची पोलिसांनी काढली हवा

कॅमेरा का बसवला? (Why install a camera?)-

या व्यक्तीला या कॅमेऱ्यानं टिपलेले फुटेज मिळवता आले नाही. परंतु कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी हा कॅमेरा बसवला असावा, असे त्यांचे मत आहे. हा कॅमेरा एखाद्या व्यक्तीवर नजर ठेवण्यासाठी ठेवला असावा. कॅमेऱ्यात मात्र बॅटरी नव्हती, असंही त्याने सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :viralCameraCatCCTV Camera
loading image
go to top