'मला पुन्हा एक संधी द्या' - झुकेरबर्ग 

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 एप्रिल 2018

'माहिती चोरीप्रकरणी मी माझी चूक स्विकारतो. माणसाकडून चूका होतात, त्यातूनच पुढे तो शिकत जातो. माला माझ्या जबाबदारीची जाणीव आहे. लोकांचा विश्वास परत मिळविण्याचा मी प्रयत्न करेन. मला एक संधी द्या'.

-  मार्क झुकेरबर्ग

वॉशिंग्टन : फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने 'मला पुन्हा एक संधी द्या' असे आज पत्रकार परिषदेत सांगितले. फेसबुकवरील युजर्सच्या महिती चोरीप्रकरणी मागील काही दिवस फेसबुक व केंब्रिज अॅनालिटीका ही राजकीय विश्लेषक कंपनी चर्चेत आहे. यामुळे फेसबुकवर टिका झाली व फेसबुकवरील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

facebook images

फेसबुकसाठी अजूनही तुम्हीच योग्य नेतृत्व आहात का, असे पत्रकारांनी विचारल्यानंतर झुकेरबर्ग म्हणाला की, 'माहिती चोरीप्रकरणी मी माझी चूक स्विकारतो. माणसाकडून चूका होतात, त्यातूनच पुढे तो शिकत जातो. माला माझ्या जबाबदारीची जाणीव आहे. लोकांचा विश्वास परत मिळविण्याचा मी प्रयत्न करेन. मला एक संधी द्या'.

केंम्ब्रिज अॅनालिटीकाने फेसबिकवरील युजर्सची माहिती राजकीय उद्देशासाठी वापरली हे चुकीचेच झाले. आम्ही लोकांचाल विश्वास गमावला आहे, परंतु आता फेसबुकच्या सुरक्षितेत आणखी वाढ करायच्या दृष्टीने आम्ही काम चालू केले आहे. या चूका दुरूस्त करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत व लवकरच लोकांचा विश्वास परत मिळवू अशी मला खात्री वाटते, असेही झुकेरबर्गने पत्रकारांना सांगितले.     
 

Web Title: Give Me Another Chance said by mark Zuckerberg