लेह-लडाखसह हिंदुकुश उजळवणाऱ्या संस्थेला संयुक्त राष्ट्रांचा पुरस्कार

United_Nations_Award
United_Nations_Award

न्यूयॉर्क : लेह लडाखसह हिंदुकुश पर्वतराजीतील दुर्गम भागांमध्ये सौर उर्जा पोचवण्यासाठी पर्यटन आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणाऱ्या भारतातील संस्थेला संयुक्त राष्ट्रांचा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्लोबल हिमालयन एक्स्पीडिशन (जीएचई) असे या संस्थेचे नाव असून हवामान बदलाच्या विरोधातील पुरस्काराची त्यांच्या प्रयत्नपूर्वक कृतीशीलतेवर मोहोर उमटली आहे.

यूएन ग्लोबल क्लायमेट अॅक्शन अॅवॉर्ड असे पुरस्काराचे नाव आहे. वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिल (डब्ल्यूटीटीसी) आणि युनायटेड नेशन्स टुरीझम ऑर्गनायझेशन (यूएनडब्ल्यूटीओ) या दोन संघटनांची मान्यता असलेल्या भागांमध्ये जीइचई कार्य करते. हिंदुकुश विभागात मूलभूत ऊर्जेपासून वंचित असलेल्या लोकांची संख्या एक कोटी ६० लाख आहे. या भागात जीएचई मोहिमांचे आयोजन करते आणि त्यातील शुल्काचा काही भाग सौरऊर्जा सुविधेवर खर्च करते. ही सुविधा गावकरीच चालवितात.

पुरस्कार विजेत्यांनी हवामान बदलाच्या विरोधात जगभर कार्य सुरू असल्याची मूर्त उदाहरणे निर्माण केली आहेत. त्यामुळे कोरोनाच्या जागतिक साथीतून सावरत हरित पुनरागमन करण्यासाठी देश, कंपन्या व शहरांनी सक्रिय पुढाकार घ्यावा असे आवाहन मी अधोरेखित करतो. 
- अँटोनिओ गुटेरेस, यूएन सरचिटणीस

कोरोनामुळे प्रत्येक खंडातील मोठ्या शहरांपासून लहान खेड्यांपर्यंत जीवन, अर्थव्यवस्था आणि उद्योगाच्या स्वरूपाला फटका बसला आहे. आजघडीला मानवतेसमोरील हा सर्वांत मोठा धोका असला तरी हवामान बदल हेच दीर्घकालीन आव्हान आहे, हे विसरून चालणार नाही. 
- पॅट्रीशिया एस्पीनोसा, कार्यकारी चिटणीस (यूएनसीसी)

हवामान बदलाच्या समस्येवर कृतिशील तोडगा काढणाऱ्यांचे प्रयत्न उदात्त आणि अनुकरणीय आहेत. पॅरिस करार आणि चिरंतन विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या विविध देशांच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नांना चालना देण्याचा व्यापक भाग म्हणजे हा पुरस्कार होय.
- गॅब्रीएली गीनर, पुरस्कार सल्लागार समिती अध्यक्षा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com