esakal | Global: कुवेतच्या महिला बनणार रणरागिणी
sakal

बोलून बातमी शोधा

कुवेतच्या महिला बनणार रणरागिणी

कुवेतच्या महिला बनणार रणरागिणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कुवेत सिटी : महिलांना लष्करी सेवेत भरती होण्याची संधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कुवेतने घेतला आहे. लष्करात भरतीसाठी नाव नोंदविण्याची परवानगी महिलांना देण्यात आली.

कुवेतचे उपपंतप्रधान शेख हमाद जाबेर अल-अली अल अल-सबाह यांनी ही घोषणा केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार अर्जदार महिलांना प्रारंभी वैद्यकीय आणि लष्करी मदत या विभागांत सेवा करावी लागेल. कुवेतमधील महिला गेल्या दोन दशकांपासून पोलिस दलात सेवा करीत आहेत. लष्करातील भरतीचा त्यांचा मार्ग त्यामुळेच सुकर झाला.

पुरुषांचे वर्चस्व असलेल्या विविध क्षेत्रांत महिलांना हक्क मिळतील यासाठी कुवेतने गेल्या काही वर्षांत महत्त्वपूर्ण प्रगती साध्य केली आहे. २००५ मध्ये मतदानाचा हक्क आणि लोकनियुक्त कार्यालयातील प्रतिनिधीत्वासाठी निवडणूक लढविण्याची परवानगी महिलांना देण्यात आली. तसे विधेयक मंजूर करण्यात आले. त्यातून आतापर्यंत चार महिला उमेदवारांनी संसदेत मानाचे स्थान पटकावले आहे. तेथील संसदेत ५० जागा आहेत.

महिला न्यायाधीशांची संख्या सुद्धा वाढली आहे. मे महिन्यात सात महिला न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे महिला न्यायाधीशांची एकूण संख्या १५ पर्यंत वाढली आहे.

हेही वाचा: नांदेड : शेतात पिकले तेवढे वाहून गेले; एका रात्रीत झाले होत्याचे नव्हते

संरक्षण मंत्र्यांना विश्वास

संरक्षण मंत्री सुद्धा असलेले उपपंतप्रधान शेख हमाद जाबेर यांनी सांगितले की, कुवेतच्या महिलांनी अनेकविध क्षेत्रांत कामगिरी करून दाखविली आहे. त्यामुळे पुरुषांच्या जोडीला लष्करात भरतीसाठी त्यांना मंजुरी देण्यात आली. लष्करात काम करण्याच्या कठोर मेहनतीचे आव्हान पेलण्याची क्षमता आमच्या महिलांकडे असल्याचा मला पुरेपूर विश्वास वाटतो.

loading image
go to top