भूकंपात 149 मेक्सिकन लोकांचा बळी; 7.1 तीव्रतेचा भूकंप

वृत्तसंस्था
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

व्हॉट्सअॅपवरून मदतीसाठी धावा...
इमारतींच्या गराड्यांखाली अडकलेले काही नागरिक व्हॉट्सअॅपवरून कुटुंबीय आणि नातेवाईकांना संदेश पाठवून मदतीचे केविलवाणे आवाहन करत आहेत. 

मेक्सिको सिटी : मेक्सिकोच्या मध्यवर्ती भागात झालेल्या मोठ्या भूकंपाने संपूर्ण देश हादरला असून, यामध्ये सुमारे दीडशे लोक मृत्युमुखी पडले आहेत. मंगळवारी झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलनुसार 7.1 एवढी होती. 

याच दिवशी 1985 मध्ये झालेल्या भीषण भूकंपामध्ये तब्बल 10 हजार लोकांचे बळी गेले होते. त्या भूकंपाच्या स्मृती या भूकंपामुळे पुन्हा ताज्या झाल्या असून, मेक्सिकन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  

भूकंपाच्या जबरदस्त हादऱ्याने मध्यवर्ती भागातील किमान 49 इमारती कोलमडून पडल्या आहेत. या भूकंपाचा धक्का सुमारे 2 कोटी लोकांना बसला आहे. पीडित लोकांना मदत करण्याचे काम सुरू आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

    Web Title: global marathi news earthquake strikes mexico death toll 149

    टॅग्स