वाघाच्या हल्ल्यात प्राणीसंग्रहालयातील महिला अधिकाऱ्याचा मृत्यू

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 मे 2017

येथील प्राणीसंग्रहालयातील वाघाने महिला अधिकाऱ्याच्या कार्यालयात घुसून हल्ला केल्याने महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

लंडन - येथील प्राणीसंग्रहालयातील वाघाने महिला अधिकाऱ्याच्या कार्यालयात घुसून हल्ला केल्याने महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

इंग्लंडच्या क्रेंब्रिजशायरमधील हॅमरटन येथील प्राणीसंग्रहालयात ही घटना घडली. प्राणीसंग्रहालयातील वाघाने सोमवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास त्याचे कुंपण ओलांडले. तो थेट एका महिला अधिकाऱ्याच्या कार्यालयात पोहोचला आणि त्याने हल्ला केला. या हल्ल्यात महिला अधिकाऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. "यापूर्वी कधीही प्राणी त्यांचे कुंपण सोडून बाहेर आले नव्हते. या घटनेबाबत कोणतीही शंका नाही', अशी माहिती केंब्रिजशायर येथील पोलिसांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.

हॅमरटन प्राणीसंग्रहालयानेही फेसबुक पोस्टद्वारे या घटनेची माहिती दिली आहे. 'आमच्या एका सहकाऱ्याचा प्राणीसंग्रहालयात मृत्यू झाला. ही एक विलक्षण घटना आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी कधीही प्राण्यांनी त्यांचे कुंपण सोडले नव्हते. नागरिकांच्या सुरक्षितेतवर यापूर्वी कधीही परिणाम झालेला नव्हता', अशी माहिती हॅमरटन प्राणीसंग्रहालयाने दिली आहे.

■ 'ई सकाळ'वरील ताज्या बातम्या
एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये २१ बालकांना नवसंजीवनी
गायक अभिजितचे ट्विटर अकाऊंट पुन्हा 'सस्पेंड'
लग्नानंतर फ्रीज, सोन्याची साखळी मागणाऱ्या पतीला अटक
हौसला बुलंद हो, तो क्या कॅन्सर, क्या दसवीं!
यूपीत मंत्र्यांकडून बारचे उद्घाटन; योगींनी मागितले स्पष्टीकरण
ब्राझीलच्या साखर उत्पादनात वाढ
आपल्यासाठी देश प्रथम हवा: नौदल प्रमुख लांबा
एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये २१ बालकांना नवसंजीवनी

आपल्यासाठी देश प्रथम हवा: नौदल प्रमुख लांबा
एनडीए पासिंग आउट पॅड (फोटो)

Web Title: global news england news tiger attack women officer death tiger zoo securitybreaking news