काबूलमधील स्फोटात 80 ठार; 300 जखमी

वृत्तसंस्था
बुधवार, 31 मे 2017

काबूल (अफगाणिस्तान) : राजधशनी काबूलमध्ये आज (बुधवार) सकाळी भारतीय दुतावासाजवळ झालेल्या शक्तीशाली बॉम्ब स्फोटामध्ये आतापर्यंत 80 जण ठार झाले असून 300 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या स्फोटात एकही भारतीय नागरिक जखमी झालेला नसल्याची माहिती भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे.

काबूल (अफगाणिस्तान) : राजधशनी काबूलमध्ये आज (बुधवार) सकाळी भारतीय दुतावासाजवळ झालेल्या शक्तीशाली बॉम्ब स्फोटामध्ये आतापर्यंत 80 जण ठार झाले असून 300 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या स्फोटात एकही भारतीय नागरिक जखमी झालेला नसल्याची माहिती भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे.

भारतीय दूतावासापासून काही मीटर अंतरावर आज सकाळी गर्दीच्या वेळी हे स्फोट घडले. या स्फोटात फ्रेंच आणि जर्मन दूतावासाचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. जर्मन दूतावासाजवळ एका मोटारीत बॉम्ब ठेवण्यात आला होता. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार हा आत्मघातकी हल्ला असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 80 जण ठार आणि 300 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती काबूलमधील आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. स्फोट एवढा शक्तीशाली होता की स्फोटाच्या ठिकाणाहून शेकडो मीटर दूर असलेल्या घरांच्या खिडक्‍या आणि दारे फुटले आहेत.

स्पनेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. "काबूलमधील हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. मृतांच्या कुटुंबियांसोबत आमच्या संवेदना आहेत. जखमींसाठी आम्ही प्रार्थना करतो. सर्व प्रकारच्या दहशतवादाविरूद्ध लढा देण्यासाठी भारत अफगाणिस्तानसोबत आहे. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या शक्तींना हाणून पाडायला हवे', अशा शब्दांत मोदी यांनी ट्‌विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या हल्ल्याची जबाबदार अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
मॉन्सून 8 जूनला मुंबईत: हवामान विभाग​
लोकांनी काय खावे हे सरकार ठरवत नाही: केंद्रीय मंत्री
बीफ फेस्टिव्हलवरून विद्यार्थ्याला मारहाण​
मुख्यमंत्र्यांचा शेट्टी, जयंतरावांवर नेम; सदाभाऊंची ढाल​
दिल्ली आयआयटीतील विद्यार्थीनीची आत्महत्या

जनावरे विक्री बंदीबाबत दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सूट शक्‍य
शेतकरी संपावर काहीही साध्य होणार नाही : माधव भंडारी
दीड पायाच्या ‘लक्ष्मी’ची झेप
#स्पर्धापरीक्षा - बलुचिस्तान
शहरांच्या जागतिक क्रमवारीत पुणे तेरावे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: global news international news kabul blast marathi news terror news