सायबर सुरक्षेसाठी सहकार्याची इस्राईलची तयारी

माधव गोखले 
मंगळवार, 27 जून 2017

तेल अविव (इस्राईल) - सायबर सुरक्षेची गरज वाढत असताना जगभरातल्या अन्य देशांनाही सायबर सुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी मदत देण्याची तयारी असल्याचे इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आज सांगितले. सातव्या आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा परिषदेचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते.

भारतासह जगभरातल्या पन्नास देशांमधील सायबर क्षेत्राचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञ या परिषदेत सहभागी झाले आहेत. 

अवघ्या सात मिनिटांच्या भाषणात नेतान्याहू यांनी सध्याच्या काळात सर्वांत वेगाने वाढणाऱ्या सायबर सुरक्षा व्यवसायाकडे गांभीर्याने पाहण्याच्या मुद्द्यावर भर दिला. विविध स्तरांतून निर्माण होऊ शकणारा धोका पाहता सर्वच देशांना सायबर सुरक्षा महत्त्वाची वाटत असल्याचे नेतान्याहू म्हणाले. सायबर सुरक्षा ही न संपणारी गरज असल्याने या उद्योगात स्वतःचे स्थान निर्माण करण्याची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत अनेक ‘स्टार्टअप’ना संधीही आहे, असेही ते म्हणाले.

मोदींच्या दौऱ्याची उत्सुकता
जगातल्या अनेक देशांना इस्राईलबरोबर सहकार्य करण्याची इच्छा असल्याचे सांगताना बेंजामिन नेतान्याहू यांनी आपले मित्र, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या आठवड्यात इस्राईलला भेट देणार असल्याचे सांगितले. भारत-इस्राईल मैत्री संबंधाना पाव शतक पूर्ण होत असतानाच्या या दौऱ्याबद्दल येथे खूप उत्सुकता आहे. मोदी यांच्या दौऱ्यात सायबर सुरक्षेबरोबरच पाणी आणि शेतीविषयक मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे.

Web Title: global news Israeli support for cyber security