शारजाहमध्ये भारतीयाची गळफास घेऊन आत्महत्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

दुबई - खर्च परवडत नसल्याने संपूर्ण कुटुंब भारतात परतल्यानंतर शारजाहमध्ये राहणाऱ्या एका भारतीयाने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अर्वाचन जेकब (वय 45) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा केरळचा असून, दुबईतील जीपीएस टेक्‍निशियन कंपनीत कामाला होता.

जेकबच्या मोठ्या भावाने सांगितले की, शारजाहमधील राहण्याचा खर्च परवडत नसल्याने जेकबने आपल्या कुटुंबाला भारतात पाठविले होते. त्याला एक मुलगा आणि दोन मुली असून त्या शारजाहमध्ये शिकत होत्या. त्यांना तिसरे आपत्य झाल्यानंतर त्याला सर्व गरजा भागविणे अवघड होऊ लागले होते. आपल्या एक वर्षाच्या तान्ह्या बाळाला सांभाळण्यासाठी त्याची पत्नीही कामाला जात नव्हती.

Web Title: global news marathi news maharashtra news suicide news