इम्रान खानने आध्यात्मिक गुरुसोबतच केले तिसरे लग्न!

वृत्तसंस्था
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

इम्रान यांची तिसरी पत्नी बुशरा मनेका या आध्यात्मिक गुरु आहेत. त्यांना तीन मुली आणि दोन मुले अशी पाच मुले आहेत. त्यांचा पहिला विवाह इस्लामाबाद के सिनियर कस्टम ऑफिसर खवार फरीद यांच्यासोबत झाला होता.

इस्लामाबाद - पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचे (पीटीआय) प्रमुख इम्रान खान यांनी रविवारी आध्यात्मिक गुरु बुशरा मनेका यांच्यासोबत तिसरे लग्न केले.

पीटीआयने इम्रान खान यांनी केलेल्या लग्नाची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. इम्रान खान यांच्या लग्नात कुटुंबीय व नजीकचे मित्र सहभागी झाले होते. यापूर्वी इम्रान खान यांचे दोन विवाह झाले आहेत. काजी मुफ्ती सईद यांनी त्यांचा विवाह पार पाडला. यापूर्वीही त्यांनीच त्यांचे दोन्ही विवाह पार पाडले होते.

इम्रान यांची तिसरी पत्नी बुशरा मनेका या आध्यात्मिक गुरु आहेत. त्यांना तीन मुली आणि दोन मुले अशी पाच मुले आहेत. त्यांचा पहिला विवाह इस्लामाबाद के सिनियर कस्टम ऑफिसर खवार फरीद यांच्यासोबत झाला होता. इम्रान खान यांचा पहिला विवाह ब्रिटीश नागरिक पत्रकार जेमिना खान यांच्यासोबत झाला होता. नऊ वर्षांनंतर या दोघांमध्ये 2004 साली तलाक झाला होता. त्यानंतर त्यांचा दुसरा विवाह 8 जानेवारी 2015 ला टीव्ही अँकर रेहम खान यांच्यासोबत विवाह केला. मात्र, यांचा विवाह 10 महिनेच टिकला आणि ते वेगळे झाले. आता त्यांनी तिसरा विवाह केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Global news Pakistan Imran Khan Marries His Spiritual Adviser