ट्रम्प यांच्यासोबत अफेअर नाही: हॅले 

वृत्तसंस्था
रविवार, 28 जानेवारी 2018

लेखक मायकल वोल्फ यांच्या "फायर अँड फ्यूरी' या वादग्रस्त पुस्तकात करण्यात आलेल्या टिप्पणीमुळे खळबळ उडाल्यानंतर मूळ भारतीय वंशाच्या हॅले यांनी हा खुलासा केला आहे. 

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी आपले प्रेमसंबंध असल्याच्या अफवा आक्षेपार्ह व अत्यंत घृणास्पद असल्याचा खुलासा अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील (यूएन) राजदूत निक्की हॅले यांनी केला.

UN ambassador Nikki Haley says rumors of affair with Donald Trump are disgusting

या अफवांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे स्पष्ट करतानाच त्या म्हणाल्या, की "एअरफोर्स वन' या विमानातून प्रवास करण्याचा योग एकदाच आला असून, अन्य काही जणही त्या वेळी सोबत होते. मी माझ्या राजकीय भवित्यव्याविषयी ट्रम्प यांच्याशी चर्चा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, वास्तव्यात आपण अशी कोणतीही चर्चा केलेली नाही.

लेखक मायकल वोल्फ यांच्या "फायर अँड फ्यूरी' या वादग्रस्त पुस्तकात करण्यात आलेल्या टिप्पणीमुळे खळबळ उडाल्यानंतर मूळ भारतीय वंशाच्या हॅले यांनी हा खुलासा केला आहे. 

Web Title: Global news UN ambassador Nikki Haley says rumors of affair with Donald Trump are disgusting