गोव्यात क्रॉस तोडफोडीचे सत्र थांबेना; पोलिस हतबल

अवित बगळे
शुक्रवार, 14 जुलै 2017

कालकोंडा मडगाव येथील क्रॉसची मोडतोड़ करून पोलिसांना आव्हान दिले आहे.

पणजी : पोलिसांनी सर्व ताकद दक्षिण गोव्यात पणाला लावली असतानाच धार्मिक प्रतिकांची तोडफोड मात्र थांबलेली नाही. धार्मिक प्रतिकांच्या तोडफोडीची मालिका थांबवण्यात पोलिस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. आजही मडगावलगत एका क्रॉसची तोडफोड करण्यात आली आहे.

दक्षिण गोव्यात गेले काही दिवस सुरू असलेल्या धार्मिक प्रतिकांच्या तोडफोडीच्या घटना रोखण्यात पोलिस यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. पोलिस संशयितांचा छडा लावू शकले नसल्याने नाराजी वाढली आहे. गुरुवारी रात्री कालकोंडा मडगाव येथील क्रॉसची तोडफोड करण्यात आली आहे.

पोलिसांच्या नाकावर टिच्चून रात्री कालकोंडा मडगाव येथील क्रॉसची मोडतोड़ करून पोलिसांना आव्हान दिले आहे. कालकोंडा येथील कृष्ण मंदिरासमोर काही दिवसांपूर्वी तोडफोड झालेल्या क्रॉसची समाजकंटकांनी पुन्हा तोडफोड केल्याने स्थानिक लोक पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

ई सकाळवरील आणखी बातम्या : 
काश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थी नको- चीनला भारताचा इशारा
अडीच वर्षांच्या अवीर जाधवचा नवा विक्रम
बाणेर-हिंजवडी रस्त्यास शेतकऱ्यांचा विरोध
पंतप्रधानांनी हिटलरचा मार्ग पत्करावा - संजय राऊत
कर्नाटकमध्ये पेट्रोल सव्वाआठ रुपये स्वस्त

Web Title: goa cross destruction spree goes on