अमेरिकेत गोळीबारात विद्यार्थ्यांसह 17 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

फ्लोरिडामधील पार्कलॅन्ड येथील स्टोनमॅन डगलस शाळेत बुधवारी गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात विद्यार्थ्यांसह 17 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, निकोलस क्रुज असे या हल्लेखोराचे नाव आहे.

फ्लोरिडा : अमेरिकेतील फ्लोरिडा प्रातांत असलेल्या पार्कलॅन्डमधील एका शाळेत माजी विद्यार्थ्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात विद्यार्थ्यांसह 17 जणांचा मृत्यू झाला. गोळीबार करणाऱ्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

फ्लोरिडामधील पार्कलॅन्ड येथील स्टोनमॅन डगलस शाळेत बुधवारी गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात विद्यार्थ्यांसह 17 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, निकोलस क्रुज असे या हल्लेखोराचे नाव आहे. निकोलस हा या शाळेचा माजी विद्यार्थी असून त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले होते.

निकोलस शाळेत घुसल्यानंतर त्याने फायर अलॉर्म वाजवला आणि अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी शाळेतील विद्यार्थी वर्गांमध्येच लपून बसले होते. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी शाळेच्या इमारतीला घेरले आणि शाळेतील विद्यार्थ्यांची सुटका केली. याचबरोबर, या गोळीबाराची घटना घडल्यानंतर एक तासाहून अधिक वेळानंतर निकोलसला पोलिसांनी अटक केल्याची माहिती येथील ब्रोवार्ड काऊंटीच्या शेरिफ कार्यालयाने माहिती दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: golbal news Florida shooting Ex student opens fire kills 17