रशियाबरोबर मैत्री असणे ही चांगलीच गोष्ट : ट्रम्प

यूएनआय
सोमवार, 9 जानेवारी 2017

रशियाशी मैत्री चुकीची आहे, असे फक्त मूर्ख लोकांनाच वाटते. मी अध्यक्ष झाल्यावर रशिया अमेरिकेचा पूर्वीपेक्षा अधिक पटीने आदर करेल

वॉशिंग्टन - रशियाबरोबर मैत्री असणे ही चांगली गोष्ट आहे, फक्त "मूर्ख' लोकांनाच ही मैत्री नको वाटते, असे सांगत अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाबाबतचे आपले धोरण स्पष्ट केले आहे.

नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत रशियाने हॅकिंगच्या माध्यमातून ढवळाढवळ केल्याचा आरोप सध्याचे सरकार करत असताना ट्रम्प यांनी मात्र रशियाची बाजू घेतली आहे. आज ट्विटरवर ट्रम्प यांनी भूमिका मांडली. "रशियाशी मैत्री चुकीची आहे, असे फक्त मूर्ख लोकांनाच वाटते. मी अध्यक्ष झाल्यावर रशिया अमेरिकेचा पूर्वीपेक्षा अधिक पटीने आदर करेल,' असे ट्रम्प म्हणाले.

Web Title: Good to be a friend of russia, says trump