छप्पर फाडके! गुगलकडून कर्मचाऱ्यांना सव्वा लाखांचा बोनस जाहीर

गुगलने ऑफिसमधून काम करण्याची योजनादेखील पुढे ढकलली आहे.
Google Office
Google OfficeGoogle

गुगलची मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेटने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. गुगलने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 1600 डॉलर्स अर्थात भारतीय चलनात जवळपास 1 लाख 20 हजार रुपये रोख वन टाईम बोनस देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे. याशिवाय गुगलने नुकताच वर्क फ्रॉम होम बंद करून ऑफिसमधून काम करण्याची योजनादेखील पुढे ढकलली आहे.

Google Office
'शरद पवारांनी ठरवलंय... 2024 मध्येही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री'

जगभरातील आपल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 1600 डॉलर्स इतका एकरकमी बोनस देण्याची घोषणा गुगलने बुधवारी केली आहे. बोनस मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये गुगलच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांसोबतच एक्स्टेंडेड वर्कफोर्स आणि इंटर्न्स यांचादेखील समावेश असणार आहे. त्या-त्या कर्मचाऱ्यांच्या देशातील चलनानुसार 1600 डॉलर्सची जेवढी किंमत होईल, तेवढी रक्कम कर्मचाऱ्याला बोनस म्हणून दिली जाणार आहे.

कंपनीकडून कर्मचाऱ्यांसाठी जाहीर करण्यात ही रक्कम चालू महिन्यातच म्हणजेच डिसेंबर 2021 मध्येच मिळणार असल्याचे अल्फाबेटकडून जाहीर करण्यात आले आहे. गुगलकडून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा भत्ता दिला जातो. याशिवाय, नुकताच कंपनीकडून कर्मचाऱ्यांसाठी 500 डॉलर्स वेलबिइंग बोनसदेखील देण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा कंपनीने कर्मचाऱ्यांना एकरकमी बोनस देण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, 10 जानेवारीपासून गुगलने कर्मचाऱ्यांना कंपनीत येऊन काम करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, नव्याने सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका आणि कर्मचाऱ्यांचा विरोध या पार्श्वभूमीवर गुगलने हा निर्णय स्थगित केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com