गुगलने डुडलद्वारे साजरा केला 18 वा वाढदिवस

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली - जगातील सर्वांत मोठे सर्चइंजिन असलेले गुगल आज (27 सप्टेंबर) आपला 18 वा वाढदिवस साजरा करत असून, यानिमित्त त्यांनी खास डुडल सादर केले आहे. 

गुगलने 18 वर्षांचे झाल्याने ते खऱ्याअर्थाने प्रौढ झाले असेही बोलण्यात येत आहे. गूगलच्या वाढदिवसावरुन वाद असून, याबाबत अद्यापही संदिग्धता आहे. पण, गुगलने स्वतःच 2006 मध्ये 27 सप्टेंबरला आपला वाढदिवस साजरा केल्यानंतर दरवर्षी हा वाढदिवस डुडलच्या माध्यमातून साजरा करण्यात येतो. 1998 मध्ये गूगलने आपला पहिला वाढदिवस साजरा केला होता.

जगात कोणत्याही गोष्टीची ऑनलाईन माहिती शोधण्यासाठी गुगलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. 4 सप्टेंबर 1998ला गुगल पहिल्यांदा जगासमोर आले होते. लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांनी गुगलची स्थापना केली होती. पेज आणि ब्रेन यांनी गूगलचं नाव ‘बॅकरब’ असं ठेवले होते. पण, नंतर ते गुगल असे करण्यात आले.

Web Title: Google celebrates 18th birthday with a Doodle

टॅग्स