Ukraine-Russia War : भारतीयांच्या मदतीसाठी सरकाकडून हेल्पलाइन नंबर जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

helpline

भारतीयांच्या मदतीसाठी सरकाकडून हेल्पलाइन नंबर जाहीर

नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर हल्ला (Russian Ukraine War) करत युद्धाला सुरुवात केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी या हल्ल्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, युक्रेनमध्ये अजूनही हजारो भारतीय अडकले असून, अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी भारत सरकारने 24 तास हेल्पलाइन सुरू केली आहे. तत्पूर्वी भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी युक्रेनला जाणारे एअर इंडियाचे विमान दिल्लीला अर्ध्यावाटेतून माघारी परतले आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये अजूनही अंदाजे 20 हजाराहून अधिक भारतीय अडकून पडले आहेत. ( Helpline Numbers For Indians In Ukraine)

दरम्यान, भारताने रशिया आणि युक्रेनमधील तणाव तत्काळ कमी करण्याचे आवाहन केले असून, परिस्थिती न बदलल्यास हे संकट मोठ्या संकटात बदलू शकते असा इशारा दिला आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनमध्ये सैन्य पाठवू नये आणि समस्या शांततेने सोडवाव्यात असे आवाहन केले आहे. (Russia Ukraine Latest News In Marathi)

Web Title: Government Started 24 Hour Helpline For Indians In Ukraine

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top