मोदी-ट्रम्प यांच्या मैत्रीमुळेच स्थानबद्ध - सईद

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 जानेवारी 2017

सईदच्या या संघटनेवर संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या निर्देशानुसार 2010 पासूनच लक्ष असले तरी त्यांच्यावर कारवाई करण्याचे पाकिस्तानने वारंवार टाळले आहे.

लाहोर - डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नव्याने अध्यक्ष झाल्याने सध्या ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मैत्री वाढवत आहेत. आमचा अमेरिकेशी काही संबंध नाही, पण मोदींकडून त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे. यामुळे मला स्थानबद्ध करण्यात आले आहे, असे जमात उद दावा दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईद याने म्हटले आहे.

हाफीज सईद याला लाहोरमध्ये स्थानबद्ध करण्यात आले आहे. सईद याच्यासह अब्दुल्ला उबेद, जफर इक्बाल, अब्दुर रेहमान आणि काझी काशीफ नाईझ यांनाही स्थानबद्ध करण्यात आले आले. सहा महिन्यांसाठी यांनी स्थानबद्ध करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

अमेरिकेकडून टाकण्यात येत असलेल्या दबावामुळे पाकिस्तान सरकार बंदी घालण्याची शक्‍यता असून, संघटनेच्या प्रमुख नेत्यांनाही अटक होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. अमेरिकेने दहशतवादी संघटनांविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतल्यानेच पाकिस्तान सरकारने ही हालचाल केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सईदच्या या संघटनेवर संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या निर्देशानुसार 2010 पासूनच लक्ष असले तरी त्यांच्यावर कारवाई करण्याचे पाकिस्तानने वारंवार टाळले आहे. सईद हा मुंबईत 26 नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. त्याने सतत भारताविरोधात गरळ ओकण्याचे काम केले आहे. 

Web Title: Govt issues order to place JuD chief Hafiz Saeed under house arrest

व्हिडीओ गॅलरी