gps-girl
gps-girl

दिशा दाखवणारी जीपीएस गर्ल

गुगल मॅपच्या जीपीएस तंत्रज्ञानात एका महिलेचा गोड आवाज चालकाला मार्गदर्शन करत असतो. उजवीकडे जा... पाचशे मीटरवर आपले डेस्टिनेशन आहे, अशी ती महिला सांगते. शेवटी कोण ही महिला, असा प्रश्‍न आपल्याला पडतो. तिचे नाव आहे केरेन जेकबसन. या आवाजाचा सोशल मीडियावरही बोलबाला आहे.

केरेन एलिजाबेथ जेकबसन
जन्माने ऑस्ट्रेलियन असलेली आणि न्यूयॉर्क येथील उद्योगपती, गायिका, व्हॉइस ओव्हर कलाकार, गीतकार आणि मोटिव्हेशनल स्पिकर म्हणून केरेन जेकबसनची ओळख. 
वयाच्या सातव्या वर्षापासून तिने गाणी लिहिण्यास सुरुवात केली. 
ऑस्ट्रेलियाच्या दूरचित्रवाणीवरच्या कार्यक्रमात तिचा नियमित सहभाग राहिला. तिने दूरचित्रवाणी, रेडिओ आणि ऑनलाइनच्या असंख्य जाहिरातींना आवाज दिला. 
२००२ मध्ये जेकबसनच्या आवाजाची जीपीएस यंत्रणेसाठी टेस्क्‍ट टू स्पिच तंत्रज्ञानासाठी निवड. गुगलच्या जीपीएस तंत्रात तिच्या आवाजाचा वापर होऊ लागल्याने ‘जीपीएस गर्ल’ म्हणून तिची ओळख प्रस्थापित झाली.
२०११ ते २०१४ या काळात जेकबसनचा आवाज ॲपल आयफोन, आयपॉड आणि आयपॅडच्या सिरी ॲप्लिकेशनसाठी वापरला गेला. 
आतापर्यंत ४० कोटींहून अधिक उपकरणांमध्ये हा तिचा आवाज वापरला गेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com