खारकिव्हमधून रशियाला सीमेपार ढकलले

युक्रेनी सैनिकांचा मोठा विजय; पूर्व भागात मात्र हल्ले सुरुच
Great victory for Ukrainian troops Kharkiv russian troops at border
Great victory for Ukrainian troops Kharkiv russian troops at bordersakal

किव्ह : युक्रेनच्या सैनिकांनी आज खारकिव्ह भागात मोठे यश मिळवित रशियाच्या सैन्याला त्यांच्या देशाच्या सीमेपर्यंत मागे ढकलले. या विजयामुळे युक्रेनी सैनिकांचे मनोबल वाढले असून देशाच्या इतर भागांतही प्रतिकार तीव्र झाला आहे. युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे शहर असलेल्या खारकिव्हमधून रशियाच्या सैन्याची हकालपट्टी करण्यात युक्रेनी सैनिकांना काही दिवसांपूर्वी यश आले होते. आज त्यांनी रशियन फौजांना पार त्यांच्या देशाच्या सीमेपर्यंत मागे ढकलले.

सीमेवरील ठाण्याजवळ युक्रेनी सैनिक जमा झाल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करत युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने सैनिकांचे अभिनंदन केले आहे. पूर्व भागात मात्र रशियाचे जोरदार हल्ले सुरुच आहेत. लुहान्स्क भागात रशियाने केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात दोन जणांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले आहेत. दोन्तेस्क भागातही रशियन सैनिकांनी नागरी वस्त्यांवर हल्ले केले.

खारकिव्ह भागात विजय मिळाल्याने येथील युक्रेनी सैनिकांना पूर्वेकडे पाठविण्याचा युक्रेन सरकारचा विचार आहे. मात्र, उत्तर सीमेवर रशियाचा मित्रदेश असलेल्या बेलारुसचे सैन्य सज्ज असल्याने युक्रेनला सैन्य हलविण्याबाबत फेरविचार करावा लागणार आहे.

‘मॅक्डोनल्ड’ने रशिया सोडले

तीस वर्षांपूर्वी शीतयुद्धानंतर सोविएत महासंघाने जागतिक कंपन्यांसाठी कवाडे उघडली होती, त्यावेळी रशियात व्यवसाय सुरु केलेल्या मॅक्डोनल्ड कंपनीने हा देश कायमस्वरुपी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रशियातील मानवाधिकारांची ढासळती स्थिती आणि बेभरवशाचे वातावरण यामुळे रशियातील व्यवसाय बंद करत असल्याचे कारण या कंपनीने दिले.

युद्धाच्या आघाडीवर

  • ईशान्य भागात युक्रेन सैनिकांचा विजय

  • रशियाचे हल्ले विस्कळीत झाल्याने युक्रेनचा विजय शक्य : नाटो

  • ‘नाटो’चा विस्तार ही मोठी चूक ठरेल : रशिया

  • इस्टोनिया आणि लाटव्हियामध्ये नाटोचा सर्वांत मोठा युद्धसराव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com