ग्रेटाची अमेरिकन नागरिकांना साद; म्हणाली पर्यावरणासाठी बायडेन यांना द्या साथ

Greta Thunberg
Greta Thunberg

स्टॉकहोम : अमेरिकेची निवडणूक ही अनेक अंगाने महत्वपूर्ण असते. निव्वळ अमेरिकेवर नव्हे तर या निवडणुकीचे जगावर परिणाम होतात. अमेरिकेच्या निवडणुकीचे पर्यावरणीय चळवळीवरही महत्वपूर्ण परिणाम होतात. आणि म्हणूनच अलिकडेच जागतिक पातळीवर पर्यावरणाच्या संरक्षणासाठी म्हणून लढणारी अशी कार्यकर्ती म्हणून जिचा नावलौकिक झाला त्या ग्रेटा थनबर्गने आता अमेरिकेच्या मतदारांना एक आवाहन केलं आहे. स्विडीश पर्यावरण प्रचारक ग्रेटा थनपर्गने शनिवारी अमेरिकेच्या मतदारांना एक आवाहन केलं आहे. तिने म्हटलंय की या निवडणुकीत जो बायडेन यांना मत द्या आणि त्यांना निवडून आणा.

ग्रेटाने म्हटलंय की, पर्यावरणात होणाऱ्या बदलांविरोधात लढण्यासाठी अमेरिकेची निवडणूक महत्वाची आहे. 'फ्रायडेज फॉर फ्यूचर' या आंदोलनाची सुरवात ग्रेटाने केली होती. तिने ट्विटरवर म्हटलंय की, मी कधीही कोणत्याही पक्षीय राजकारणात सामिल होत नाही. मात्र, अमेरिकेची निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. पर्यावरणीय दृष्टीकोनापासून ही निवडणूक फार लांब आहे आणि आपण आपल्यापैकी अनेकांनी आपापल्या उमेदवारांना समर्थन दिलं असेल. पण, मला म्हणायचंय ते आपल्याला माहितीच असेल. फक्त संघटीत व्हा आणि जो बायडेन यांना मत द्या...


जो बायडेन हे डेमोक्रॅटीक पक्षाकडून रिपब्लिक पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांना टक्कर देत आहेत. ट्रम्प हे पर्यावरणातील हानीकारक बदलांच्या इशाऱ्याला फार महत्व देत नाहीत. त्यांनी ग्रेटाच्या एकूण आंदोलनाला आणि म्हणण्यालादेखील नाकारले आहे. ट्रम्प यांनी याआधी म्हटलं होतं की, ग्रेटाला आपल्या रागाच्या व्यवस्थापनावर काम करायला हवं. ग्रेटाने संयुक्त राष्ट्राला संबोधित करताना ट्रम्प यांना आव्हान देत म्हटलं होतं की, आप ही हिम्मत कशी करु शकता? याला उत्तर देत ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, ती एक खुप आनंदी तरुण मुलीसारखी दिसेतय, जी एक उज्ज्वल आणि अद्भूत भविष्याच्या प्रतीक्षेत आहे. 

हेही वाचा - श्रीकांत दातार ‘हार्वर्ड’चे नवे डीन
दुसऱ्या बाजूला बायडेन यांनी ग्रेटाच्या या पर्यावरणातील बदलांविरोधातील लढाईबद्दल कौतुक केलं आहे. मागच्या महिन्यात सायंटिफिक अमेरिकन या मॅगझिननेही बायडेन यांना मत देण्याचे आवाहन केले आहे. जवळपास 200 वर्षांनंतर पहिल्यांदाच त्यांनी अशी राजकीय भुमिका घेतली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com