श्रीलंकन नेव्हीचा भारतीय मासेमारांवर हल्ला; एक बोट बुडाली

Sri Lankan Navy Attack On Indian Fishermen
Sri Lankan Navy Attack On Indian Fishermen esakal

भारतीय मासेमारांवर (Indian fishermen) श्रीलंकेच्या नेव्हीकडून (Sri Lankan Navy) हल्ल्याचे सत्र सुरूच असून आता भारतीय मासेमारांच्या एका गटावर लंकन नेव्हीच्या जवानांनी हल्ला चढवला. भारतीय मासेमार ज्यावेळी भारताच्या समुद्र हद्दीत मासेमारी (Fishing) करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला झाला. या हल्ल्यात एक बोटही बुडाली आहे. याबाबतची माहिती मत्सव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.

Sri Lankan Navy Attack On Indian Fishermen
आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व मैंदर्गीचे 'डॉ सुधीर सिंदगी' करणार

गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंकेची नेव्ही भारतीय मासेमारांना सातत्याने त्रास देत आहे. अनेकवेळा लंकेचे नेव्ही अधिकारी भारतीय समुद्र हद्दीत येतात आणि भारताच्या मासेमारांना अटक करुन घेऊन जातात. याबाबत स्थानिक मासेमारांनी अनेकवेळा केंद्र सरकारकडे याबाबत तक्रार केली आहे. या प्रकरणात लक्ष घालून केंद्र सरकारने कायमचा तोडगा काढावा अशी स्ठानिक मासेमारांच्या नेत्यांची मागणी आहे.

Sri Lankan Navy Attack On Indian Fishermen
जोकोविचचे खायचे दात वगेळ आणि दाखवायचे वेगळे?

काही दिवसांपूर्वी लंकन नेव्हीने भारताचे आठ ते दहा मासेमारांना पकडून आपल्या ताब्यात ठेवले होते. त्यावेळी तामिळनाडूमधील मासेमारांच्या नेत्यांनी मत्सव्यवसाय विभाग आणि केंद्र सरकारने या प्रकरणात लक्ष घातले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com