हाफीज सईदचा पक्ष दहशतवादी संघटना

पीटीआय
मंगळवार, 3 एप्रिल 2018

राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यासाठी पाकिस्तान सरकारच्या गृहमंत्रालयाचे ना हारकत प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने "एमएमएल'ला दिले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिकेने "एमएमएल'च्या मुसक्‍या आवळल्या आहेत. पाकिस्तानात चालू वर्षी जुलैमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. 

वॉशिंग्टन : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा "मास्टर माइंड' हाफीज सईद याने स्थापन केलेल्या राजकीय पक्षाला अमेरिकेने आज दहशतवादी संघटना ठरविले. तसेच एमएमएल ही विदेशी दहशतवादी संघटना असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे हाफीजची राजकीय वाटचाल अडचणीत आली आहे. 

हाफीजने मिली मुस्लिम लीग (एमएमएल) या राजकीय पक्षाची स्थापना केली असून, पाकिस्तानातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये उमेदवार उभे करणार असल्याचेही जाहीर केले आहे. मात्र अमेरिकेने "एमएमएल'ला विदेशी दहशतवादी संघटनेचा दर्जा देत पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीतील सात सदस्यांनाही विदेशी दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. तसेच "लष्करे तोयबा'शी संबंधित असलेल्या तेहरिके अझादी ए काश्‍मीर या संघटनेलाही दहशतवादी संघटना म्हणून अमेरिकेने घोषित केले आहे. 

राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यासाठी पाकिस्तान सरकारच्या गृहमंत्रालयाचे ना हारकत प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने "एमएमएल'ला दिले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिकेने "एमएमएल'च्या मुसक्‍या आवळल्या आहेत. पाकिस्तानात चालू वर्षी जुलैमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. 
 
Web Title: Hafiz Saed new party formation Terrorist party