हफिज सईदच्या नजरकैदेत वाढ

वृत्तसंस्था
रविवार, 30 एप्रिल 2017

पाकिस्तानमधील पंजाब सरकारने दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत सईद व त्याच्या चार साथीदारांची कैद आणखी 90 दिवसांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मलिक झफर इक्‍बाल, अब्दुर रेहमान अबीद, काझी काशिफ हुसेन आणि अब्दुल्ला उबैद अशी सईद याच्या साथीदारांची नावे आहेत.

लाहोर - पाकिस्तानकडून जमात उद दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या हफिज सईद याची नजरकैद आणखी 90 दिवसांनी वाढविण्यात आली आहे.

पाकिस्तानमधील पंजाब सरकारने दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत सईद व त्याच्या चार साथीदारांची कैद आणखी 90 दिवसांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मलिक झफर इक्‍बाल, अब्दुर रेहमान अबीद, काझी काशिफ हुसेन आणि अब्दुल्ला उबैद अशी सईद याच्या साथीदारांची नावे आहेत. पाकिस्तानमधील शांतता व सुव्यवस्था धोक्‍यात आणल्याच्या आरोपांतर्गत गेल्या 30 जानेवारी रोजी सईद याला नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

या नजरकैदेची मुदत आज रात्री संपणार होती. या पार्श्‍वभूमीवर हा संवेदनशील निर्णय घेण्यात आला आहे. सईद याच्याकडून या निर्णयास लाहोर उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये 2008 मध्ये घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही सईद याला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. मात्र न्यायालयाकडून त्याची 2009 मध्ये मुक्तता करण्यात आली होती. अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या सईद याच्यावर 1 कोटी डॉलर्सचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. 

Web Title: Hafiz Saeed to remain under house arrest for 90 days more