हाफीज सईदच्या नजरकैदेत दोन महिन्यांची वाढ

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरका असलेल्या हाफीज सईदला 31 जानेवारीपासून नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात त्याच्या नजरकैदेत तीन महिन्यांची वाढ करण्यात आली होती. आता आणखी दोन महिन्यांची वाढ करण्यात आली आहे.

लाहोर - मुंबईवर 26/11ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याच्या नजरकैदेत दोन महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. शांतता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरका असलेल्या हाफीज सईदला 31 जानेवारीपासून नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात त्याच्या नजरकैदेत तीन महिन्यांची वाढ करण्यात आली होती. आता आणखी दोन महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. हाफीज सईद याच्यासह त्याचे सहकारी अब्दुल्ला उबेद, मलिक जफर इक्बाल, अब्दुल रेहमान अबीद आणि काझी काशिफ हुसेन यांना दहशतवाद प्रतिबंधक कायद्याखाली नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

पंजाब प्रांतातील गृह मंत्रालयाने याबाबतचे निवेदन 28 जुलैला प्रसिद्ध केले आहे. सईदच्या नजरकैदेची मुदत 27 जुलैला संपली होती. त्यानंतर लगेच शांततेचे कारण देत त्याच्या नजरकैदेत 60 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सईद व त्याचे कार्यकर्ते देशात अशांतता निर्माण करण्याची शक्यता असल्याने त्यांना नजरकैदेतच ठेवण्यात येत असल्याचे, निवेदनात म्हटले आहे. त्याच्या सुटकेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकते, असेही म्हणण्यात आले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Hafiz Saeed's house arrest extended by two more months