नाकावर शेपूट असलेला कुत्रा पाहिलाय का?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

अमेरिकेच्या मिसौरी मध्ये एका कुत्र्याच्या पिल्लाच्या नाकावर शेपूट आली आहे. मिसौरीच्या रस्त्यावर फिरताना लोकांना हे कुत्र्याचे पुल्लू निदर्शनास आले. त्यांनी त्या पिल्लाला सुरक्षित ठिकाणी हलवले. 

अमेरिकेच्या मिसौरी मध्ये एका कुत्र्याच्या पिल्लाच्या नाकावर शेपूट आली आहे. मिसौरीच्या रस्त्यावर फिरताना लोकांना हे कुत्र्याचे पुल्लू निदर्शनास आले. त्यांनी त्या पिल्लाला सुरक्षित ठिकाणी हलवले. 

डेली मेलच्या अहवालानुसास, मिसौरी स्थित भटक्या कुत्र्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या संघटनेला रस्त्यावर एक पिल्लू दिसले होते. या पिल्लाच्या नाकावर शेपूट आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्या पिल्लाला सुरक्षित स्थळी हलवले. त्या पिल्लाचे नाव त्यांनी नरवाल असे ठेवले.

हे कुत्र्याचे पिल्लू दहा महिण्यांचे असल्याचे बोलले जात आहे. ज्या संघटनेने पिल्लाला रेस्क्यू केले, त्याचे संस्थापक रोशेन स्टीफन असल्याचं म्हटलं जात आहे. अशा प्रकारचं उदाहरण खरोखर विलक्षण असल्याचे संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे.


या पिल्लाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक लोक नरवाल ला पाहण्यासाठी तेथे जमले. आणि त्यासोबत खेळायला लागले. लहान मुलांनाही हे पिल्लू खुप आवडत असून ते त्याच्या सोबत सेल्फी घेत आहेत.


रोशेल यांनी पिल्लाचा प्राण्यांच्या रुग्णालयात एक्स रे काढला. कारण त्यांना शंका होती की, या शेपूट मध्ये हाड असले तर, पिल्लाला पुढे त्रास होऊ शकतो. परंतु एक्स रे पाहून डॉक्टर चकित झाले. त्यांनी नरवालच्या नाकावरील शेपटीमध्ये हाड नसल्याचे सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Have you seen a dog with a tail on the nose?