
पीपीई किटचा अभाव आणि पुरेशी काळजी घेतली जात नसल्यामुळे पाकिस्तानातील आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून कोविड रुग्णांची सेवा करत आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे किमान शंभर आरोग्य कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत.
इस्लामाबाद - पीपीई किटचा अभाव आणि पुरेशी काळजी घेतली जात नसल्यामुळे पाकिस्तानातील आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून कोविड रुग्णांची सेवा करत आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे किमान शंभर आरोग्य कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पाकिस्तानात कोरोनाचा पहिला रुग्ण फेब्रुवारीत आढळला होता. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आतापर्यंत किमान १०० आरोग्य कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. त्यात ७१ वैद्यकीय अधिकारी आणि २६ निमवैद्यकीय कर्मचारी आणि एका वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्याचा समावेश आहे. याबरोबरच १०,३०० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या चोवीस तासात आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांसह ५१ जणांना लागण झाली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरनंतर देशात पीपीई किट आणि अन्य वैद्यकीय सुविधांची टंचाई जाणवत आहे. दरम्यान, पाकिस्तानात आतापर्यंत ४००४८२ जणांना बाधा झाली असून ८९०१ जण मृत्युमुखी पडले आहेत.
अमेरिकेतून गायब झालेला रहस्यमयी खांब दिसला यूरोपात; लोकांमध्ये गोंधळ
पंतप्रधानांवर भिस्त
पंतप्रधान इम्रान खान यांनी निधी दिला तरच पुढील सहा महिन्यांसाठी आरोग्य विभाग पीपीई किट आणि अन्य सुविधा खरेदी करू शकतील, असे मेयो रुग्णालयाच्या एका डॉक्टरने म्हटले आहे. रुग्णालयात सध्या केवळ ९८१ एन-९५ मास्क असून गरज मात्र १२ हजार मास्कची आहे. सर्जिकल मास्कचीही कमतरता आहे.
Edited By - Prashant Patil