तब्बल महिन्यानंतर ढिगाऱ्याखालून जाणवली हृदयाची धडधड; बैरुतमध्ये मतदकार्य पुन्हा सुरु

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 4 September 2020

बैरुत स्फोटाला आता जवळजवळ एक महिना झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अनेकांना बाहेर काढल्यानंतर मदतकार्य बंद करण्यात आले होते.

बैरुत- बैरुत स्फोटाला आता जवळजवळ एक महिना झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अनेकांना बाहेर काढल्यानंतर मदतकार्य बंद करण्यात आले होते. मात्र, ढिगाऱ्याखाली एका सजीवाच्या हृदयाचे ठोके सुरु असल्याचे एका उपकरणात डिटेक्ट झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मदतकार्य सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

बैरुतच्या बंदरावर ठेवण्यात आलेल्या अमोनियम नायट्रेटच्या साठ्याचा 4 ऑगस्ट रोजी मोठा स्फोट झाला होता. त्यात एकूण 191 लोकांना मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. अनेकांना ढिगाऱ्याखालून काढण्यात बचावकर्त्यांना यश आले, पण अजूनही सात लोक बेपत्ता आहे. त्यातच आता ढिगाऱ्याखाली अजूनही एक सजीव असल्याचे स्पष्ट होत आहे. एका उपकरणाने ढिगाऱ्याखाली हृदयाचे ठोके सुरु असल्याचे दाखवले आहे. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा मदतकार्य सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 

भारतीय FAU:G लवकरच; PUB-G वर बंदीनंतर अक्षय कुमारची घोषणा

चिली आणि लेबनॉनच्या टीमने शुक्रवारी पुन्हा काम सुरु केले. घटनास्थळावरुन अवशेष काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली जिवंत  व्यक्ती सापडल्यास तो एक चमत्कार ठरणार आहे. ढिगाऱ्याचे अवशेष काढल्यानंतर वेळोवेळी उपकरणामध्ये हृद्याचे ठोके मोजले जात आहेत. यात ठोक्यांची गती कमी होताना दिसत आहे. सुरुवातीला मिनिटाला 16 ते 18 दरम्यान ठोके नोंदले जात होते. मात्र, आता दर मिनिटाला 8 ठोके नोंदले जात असल्याचं संबंधितांनी सांगितलं. 

स्निफर डॉग घटनास्थळी आणण्यात आले आहे. एक जीव ढिगाऱ्याखाली असल्याच्या बातमीने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेणे सुरु केले आहे. लेबनॉनी मदत टीमच्या मदतीसाठी चिली, फ्रान्स आणि अमेरिकेची टीमही आली आहे.  मदतकार्य सुरु ठेवल्यास जर्जर झालेल्या इमारती मदतकर्त्यांच्या अंगावर पडण्याची शक्यता आहे, असं सांगत काही दिवसांपूर्वी मदत कार्य थांबवण्यात आले होते. त्यामुळे नागरिक अधिक चिडले आहेत. 

चीनचे विमान पाडले का नाही? तैवानने केला खुलासा

बैरुत येथे गेल्या काही वर्षांपासून ठेवण्यात आलेल्या अमोमियम नायट्रेटच्या साठ्याला अचानक आग लागली होती. त्यातून झालेल्या भीषण स्फोटामुळे सर्व लॅबनोन हादरले होते. जवळजवळ 240 किलोमीटर दूर असलेल्या सायप्रसमध्ये या स्फोटाचे ध्वनी ऐकायला मिळाले होते. बैरुतमधील हा स्फोट शांततेच्या काळातील सर्वात मोठा स्फोट ठरला. गेल्या सहा वर्षांपासून स्फोटकांचा साठा बैरुत बंदरात पडून होता. या काळात दुसरीकडे हा साठा हटवण्याची तसदी लेबनॉन सरकारने घेतली नाही. त्यांच्या निष्काळजीपणा बैरुतच्या नागरिकांसाठी धोकादायक ठरला. लेबनॉनी नागरिकांनी यावर संतप्त होत रस्त्यावरुन उतरुन हिंसक आंदोलने केले. लेबनॉनी नागरिकांच्या रोषापुढे झुकत अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला होता. लेबनॉनी नागरिक यापूर्वीच कोरोना महामारीविरोधात संघर्ष करत होते. त्यात हा स्फोट झाल्याने देशाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. 

(edited by- kartik pujari)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heartbeat Detected Under Rubble A Month After Beirut Blast Search Resumes