16 वर्षांपासून चक्क दर आठवड्याला वधूसारखी नटते ही महिला? वाचा काय आहे प्रकरण

गेल्या 16 वर्षांपासून हीरा जीशान नावाची पाकिस्तानी महिला हा विचित्र प्रकार करत आहे.
Heera Zeeshan
Heera Zeeshansakal

प्रत्येक मुलीची इच्छा असते की तीने तिच्या लग्नात वधू प्रमाणे तयार होताना अनोखा श्रृगांर करावा. राजकुमारी सारखं नटावं. प्रत्येक मुलगी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असते. मात्र जर एखादी मुलगी दर आठवड्यात तीची ही इच्छा पुर्ण करत असेल तर.. हो, गेल्या 16 वर्षांपासून हीरा जीशान (Heera Zeeshan) नावाची पाकिस्तानी महिला हा विचित्र प्रकार करत आहे.

दर आठवड्याच्या शुक्रवारी हि महिला नवरीसारखी नटते. तिच्या हातांना मेंदी लावते. स्वत:ला दागिन्यांनी मढवते आणि लग्नाच्या नवीन पोशाखामध्ये तयार होते. ही महिला सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली.

Heera Zeeshan
युक्रेनचे जगाला आवाहन; लुहान्स्कमध्ये पाच जण मृत्युमुखी

हीरा जीशान दर आठवड्याला नवरी बनते. तिला जणू नवरी बनण्याचा छंदच लागला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? ती का असे करते? खरं तर तिच्या या विचित्र छंदाच्या मागे एक खोल आणि वेगळं कारण आहे.

या संदर्भात हीराने स्वतः सांगितलं की, आजपासून 16-17 वर्षांपूर्वी तिची आई खूप आजारी होती त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आजारी आईची शेवटची इच्छा होती की, तिच्या मृत्यूपूर्वी तिच्या मुलीचं लग्न व्हाव. अशा परिस्थितीत हीराने आपल्या आईची इच्छा पुर्ण करण्यासाठी आईला रक्त देणाऱ्या व्यक्तीशी रुग्णालयातच लग्न केलं. त्या दिवशी ती नववधूसारखी तयार झाली नव्हती आणि तीने मेकअपही केला नव्हता. त्यानंतर हीराच्या आईचाही मृत्यू झाला. हे दु:ख दूर करण्यासाठी ती दर आठवड्याला स्वत:ला नववधूप्रमाणे सजवते.

Heera Zeeshan
टेस्ला कार भारतात येणार नाही? एलॉन मस्कच्या ट्विटची चर्चा

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात राहणारी 42 वर्षीय हीरा जीशान तब्बल 16 वर्षापासून हे करतेय दर आठवड्याला ती शुक्रवारी वधूसारखी पूर्ण तयारी करते. सध्या सोशल मीडियावर हीरा जीशानची चर्चा रंगली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com