सापाचे तुकडे-तुकडे करून आमचा 'हिरो' गेला...

सोमवार, 30 सप्टेंबर 2019

फ्लोरिडा : मुलं घराबाहेर खेळण्यात मग्न होती. साप मुलांच्या दिशेने येत होता. पण, आमच्या आठ महिन्यांच्या हिरोने त्याच्यावर हल्ला करत तुकडे-तुकडे करत दोन मुलांचा जीव वाचवला पण तो गेला.

फ्लोरिडा : मुलं घराबाहेर खेळण्यात मग्न होती. साप मुलांच्या दिशेने येत होता. पण, आमच्या आठ महिन्यांच्या हिरोने त्याच्यावर हल्ला करत तुकडे-तुकडे करत दोन मुलांचा जीव वाचवला पण तो गेला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना गॅरी रिचर्डसन म्हणाले, 'माझी मुलं घराबाहेर खेळत होती. त्यांच्याजवळच साप होता. परंतु, मुलांचे लक्ष त्याच्याकडे नव्हते. यावळी आमचा आठ महिन्यांचा कुत्रा पिट बुलचे सापाकडे लक्ष गेले. त्याने तत्काळ सापावर हल्ला चढवला. सापानेही कुत्र्याला चार वेळा दंश केला. दोघांमध्ये लढाई सुरू होती. अखेर पिट बुलने सापाचे तुकडे-तुकडे केले. आम्ही आमच्या लाडक्या कुत्र्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.'

कुत्रा हा खूप प्रामाणीक प्राणी आहे. मालकाच्या संरक्षणासाठी तो स्वःताचा जीव धोक्यात घालतो. आमच्या हिरोचा जानेवारीमध्ये जन्म झाला होता. आठ महिन्यात तो आमच्या कुटुंबातील एक सदस्य झाला होता. परंतु, आमच्या मुलांच्या संरक्षणासाठी तो धावला आणि आमच्यातून तो आज निघून गेला आहे. त्याला आम्ही कधीच विसरू शकत नाही, असेही गॅरी रिचर्डसन म्हणाले.