युरोप - दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने 'हाय अलर्ट'

वृत्तसंस्था
रविवार, 19 जून 2016

ब्रसेल्स - फ्रान्समध्ये सध्या सुरु असलेल्या युरो-2016 फुटबॉल स्पर्धेदरम्यान मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याच्या उद्देशार्थ दहशतवाद्यांकडून एका "सुरक्षित‘ ठिकाणी लपविण्यात आलेल्या स्फोटके व शस्त्रास्त्रांचा शोध बेल्जियममधील सुरक्षा दले युद्धपातळीवर घेत आहेत. 

ब्रसेल्स व पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ले घडविलेल्या दहशतवाद्यांकडून हा शस्त्रसाठी लपविण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर आत्तापर्यंत 40 घरांचा शोध घेऊन झाला असून बेल्जियमध्ये एका रात्रीत मारण्यात आलेल्या छाप्यांमध्ये चौकशीसाठी 40 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या 40 जणांपैकी 12 जणांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. यानंतर या 12 पैकी 3 बेल्जियन नागरिकांविरोधात दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप ठेवण्यात येऊन इतरांना मुक्त करण्यात आले आहे. मात्र या नागरिकांना अटक करण्यात आल्यानंतरही दहशतवादी कृत्यांसाठी वापरण्यात येणारा शस्त्रसाठा शोधण्यात अद्यापी सुरक्षा दलास यश आलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा दलांकडून राबविली जात असलेली ही मोहिम अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.

पश्‍चिम युरोपमधील इतर देशांच्या तुलनेत बेल्जियम हा क्षेत्रफळाने लहान देश आहे. मात्र लोकसंख्या हा निकष विचारात घेता बेल्जियममधून पश्‍चिम आशियात दहशतवादी संघटनांसाठी लढण्यासाठी जाणाऱ्या तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. बेल्जियममधून आत्तापर्यंत 400 पेक्षाही जास्त तरुण इसिसकडून लढण्यासाठी पश्‍चिम आशियात गेले आहेत. 

Web Title: high alert in europe