हायस्पीड इंटरनेट सेवा दहा तास बंद

पीटीआय
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

ढाका : बांगलादेशात रविवारी (ता. 30) सार्वत्रिक निवडणुका होत असून, त्या पार्श्वभूमीवर दोन दिवस हायस्पीड इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून देण्यात आले.

सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी दोन दिवस हायस्पीड इंटरनेट सेवा (3जी आणि 4जी) बंद ठेवण्याचे आदेश मोबाईल इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्यांना गुरुवारी प्राप्त झाले होते. त्यानुसार सुमारे दहा तास ही सेवा बंद होती. दहा तासांनंतर शुक्रवारी (ता. 28) सकाळी ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्याचे समजते. 

3जी आणि 4जी इंटरनेट सेवा वापणाऱ्यांची बांगलादेशातील सध्याची संख्या सुमारे सहा कोटी एवढी आहे. दरम्यान, बांगलादेशच्या निवडणूक आयागानेही 3जी आणि 4जी इंटरनेट सेवा आणि सोशल मीडिया साइट तीन दिवस बंद ठेवण्यात याव्यात असा आदेश दिला होता, अशी माहितीही समोर आली आहे. 

Web Title: High Speed Internet Stopped for ten hours