लिबियाकडे 118 प्रवासी घेऊन निघालेल्या विमानाचे अपहरण

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

माल्टा : लिबियाकडे 118 प्रवाशांना घेऊन निघालेल्या विमानाचे दोन जणांनी अपहरण केले आहे. हे विमान सध्या माल्टा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले आहे. दरम्यान माल्टाचे पंतप्रधान जोसेफ मुस्काट हे अपहरणकर्त्यांसोबत तडजोडी करण्याबाबत सुरक्षा समितीसोबत चर्चा करत आहेत.

आज 'एअरबस ए 320' या विमानाचे दोन अपहरणकर्त्यांनी अपहरण केले. अपहरणकर्त्यांच्या हातात ग्रेनाईड असून त्यांचा स्फोट घडविण्याची धमकी ते देत आहेत, असे वृत्त स्थानिक वाहिन्या देत आहेत. "त्या विमानाने विमानतळावरील धावपट्टीवर बेकायदेशीरपणे हस्तक्षेप केला आहे. विमान धावपट्टीवर उतरल्यानंतरही बराच काळ धावपट्टीवर धावत होते', अशी माहिती माल्टाच्या विमानतळ प्रशासनाने दिली आहे. वाटाघाटी करण्यासाठीची समिती विमानतळावर पुढील सूचनेच्या प्रतिक्षेत आहे.

Web Title: Hijackers threaten to blow up Libyan plane with hand grenades

टॅग्स