हिलरी क्‍लिंटन या इसिसच्या संस्थापक: ट्रम्प

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 ऑगस्ट 2016

वॉशिंग्टन - अमेरिकेमधील अध्यक्षीय निवडणुकीसाठीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून डेमोक्रॅटिक व रिपब्लिकन अशा दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर प्रखर हल्ले करण्यात येत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनीही अशाच स्वरुपाचा तीव्र हल्ला डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांच्यावर केला आहे. इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेच्या हिलरी या संस्थापक असल्याची कडवट टीका ट्रम्प यांनी केली आहे.

"अमेरिका व जगभरात काय घडते आहे, याकडे लक्ष द्या. इसिसचा प्रभाव आपण वाढू दिला आहे. तेव्हा हिलरी यांना इसिसच्या संस्थापक म्हणून पुरस्कार मिळावयास हवा,‘‘ असे टीकास्त्र ट्रम्प यांनी सोडले.

याआधी, फ्लोरिडा येथे बोलताना ट्रम्प यांनी आपण राष्ट्राध्यक्ष असतो; तर 9/11 घडलेच नसते, असा दावा केला होता. हिलरी यांच्याविरोधात आता रिपब्लिकन पक्षामध्ये एकजूट असल्याचेही ट्रम्प यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Hillary Clinton or Isis founder: Trump