हिंदू विवाह कायदा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

पाकिस्तानच्या कनिष्ठ सभागृहाने चार महिन्यांपूर्वीच या कायद्याच्या मसुद्यावर शिक्कामोर्तब केले होते. या कायद्यामुळे हिंदूंच्या विवाहाची अधिकृत नोंदणी होणार असल्याने हिंदू महिलांना वाद निर्माण झाल्यास न्यायालयात दावा दाखल करता येणे शक्‍य आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानमधील हिंदू महिलांना दिलासा देणारा हिंदू विवाह कायद्याच्या मसुद्याला येथील संसदीय समितीने मंजुरी दिली आहे. यामुळे या कायद्याच्या अंमलबाजवणीसाठी आता केवळ वरिष्ठ सभागृहाची मंजुरी आवश्‍यक आहे.

पाकिस्तानच्या कनिष्ठ सभागृहाने चार महिन्यांपूर्वीच या कायद्याच्या मसुद्यावर शिक्कामोर्तब केले होते. या कायद्यामुळे हिंदूंच्या विवाहाची अधिकृत नोंदणी होणार असल्याने हिंदू महिलांना वाद निर्माण झाल्यास न्यायालयात दावा दाखल करता येणे शक्‍य आहे. यापूर्वी कायद्याअभावी हिंदू महिलांवर प्रचंड अन्याय होत होता.

Web Title: Hindu Marriage code bill in Pakistan