पाकमधील हिंदू मंदिरांना मिळणार अतिरिक्त सुरक्षा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

कराची- पाकिस्तानधील सिंध प्रांतात असलेल्या हिंदू मंदिर, चर्च व गुरुद्वारांना अतिरिक्त सुरक्षा देण्यासाठी 400 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे, अशी माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली.

वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'या प्रकल्पाअंतर्गत सिंध प्रांतातील धर्मस्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. यासाठी या गुंतवणूकीचा वापर केला जाणार आहे. पाकिस्तान पिपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी दिलेल्या निर्देशानंतर हा प्रोजक्ट लागू करण्यात येत आहे. हैदराबाद, लरकाना तसेच इतर ठिकाणी हिंदू मंदिरांवर झालेल्या हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.'

मुख्यमंत्र्यांचे विशेष सचिव खातुमल जीवन यांनी सांगितले की, 'सिंध प्रांतामध्ये असलेली हिंदू मंदिरे, चर्च व गुरुद्वारांच्या सुरक्षिततेसाठी या रक्कमेचा उपयोग केला जाणार आहे.'
 
दरम्यान, सिंध प्रांतात हिंदू, शीख व ख्रिश्चनांची एकूण 1253 धर्मस्थळ आहेत. यापैकी 703 हिंदू मंदिरे, 523 चर्च व 6 गुरुद्वार आहेत. या धर्मस्थळांच्या सुरक्षेसाठी एकूण 2310 पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.

Web Title: Hindu temples in Pakistan to get extra protection

टॅग्स