हिंदुजा बंधू बनले ब्रिटनमधील सर्वांत श्रीमंत

वृत्तसंस्था
सोमवार, 8 मे 2017

भारतीय वंशाच्या हिंदुजा बंधूंनी ब्रिटनमधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असण्याचा मान मिळवला आहे. हिंदुजा समूहाची संपत्ती 16.2 अब्ज पौंड असून मागील वर्षापेक्षा यंदा त्यांच्या संपत्तीमध्ये 3.2 अब्ज डॉलरची वाढ नोंदविण्यात आली आहे. हिंदुजा बंधूंसह ब्रिटनमधील 1000 प्रमुख अतिश्रीमंतांच्या यादीमध्ये 40 अन्य भारतीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश आहे.

लंडन - भारतीय वंशाच्या हिंदुजा बंधूंनी ब्रिटनमधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असण्याचा मान मिळवला आहे. हिंदुजा समूहाची संपत्ती 16.2 अब्ज पौंड असून मागील वर्षापेक्षा यंदा त्यांच्या संपत्तीमध्ये 3.2 अब्ज डॉलरची वाढ नोंदविण्यात आली आहे. हिंदुजा बंधूंसह ब्रिटनमधील 1000 प्रमुख अतिश्रीमंतांच्या यादीमध्ये 40 अन्य भारतीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश आहे.

'द संडे टाइम्स रिच लिस्ट'ने ब्रिटनमधील श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. मागील वर्षी युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या निर्णयाचा ब्रिटनमधील अब्जाधीशांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे 'द संडे टाइम्स रिच लिस्ट'मध्ये नमूद करण्यात आले आहे. याउलट ब्रिटनमधील अब्जाधीश 14 टक्‍क्‍यांनी वाढले असल्याचेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

■ ब्रिटनमधील प्रमुख भारतीय वंशाचे अब्जाधीश

 1. श्रीचंद आणि गोपीचंद हिंदुजा
 2. डेव्हिड आणि सिमन रुबेम
 3. लक्ष्मी मित्तल
 4. मोहसीन आणि झुबेर इस्सा
 5. राज, टोनी आणि हरपाल माथरू
 6. लॉर्ड स्वराज पॉल
 7. श्री प्रकाश लोहिया
 8. अनिल अगरवाल
 9. सुनील वासवानी
 10. सिमन, बॉबी, रॉबिन अरोरा
 11. नवीन आणि वर्षा इंजिनिअर
 12. जसमिंदर सिंह
 13. भिक्‍खू आणि विजय पटेल
 14. जटानिया बंधू
 15. कुलजिंदर बहिया आणि कुटुंबीय
 16. टॉम सिंग आणि कुटुंबीय
 17. अनिश कपूर
Web Title: Hinduja is the richest man in Britain