रशिया युक्रेनवर आक्रमण करणार असल्याचा इशारा; झेलेन्स्कींचे दुर्लक्ष

बायडेन : गुप्तचर विभागाकडे माहिती असल्याचा दावा
Hints that Russia will invade Ukraine Zelensky disregard joe Biden Los Angeles
Hints that Russia will invade Ukraine Zelensky disregard joe Biden Los Angelessakal

लॉसऐंजिल्स : रशिया युक्रेनवर आक्रमण करणार असल्याचा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने दिला होता. पण युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असा खुलासा अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी शुक्रवारी केला. ते म्हणाले, ‘‘मी कदाचित अतिशयोक्ती करत आहे, असे बऱ्याच लोकांना वाटत असेल, हे मला माहीत आहे. पण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे सीमेपलिकडे आक्रमण करणार होते, याची संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे. त्याबद्दल शंका घेण्याचे काही कारण नव्हते. पण झेलेन्स्की यांनी ते ऐकून घ्यायचे नव्हते.’’ डेमोक्रॅटिक पक्षाच्या निधी संकलन कार्यक्रमात ते बोलत होते. युक्रेन-रशिया युद्ध चौथ्या महिन्यातही सुरु आहे.

अमेरिकेकडून युक्रेनला मदत व पाठिंबा देण्यासाठी सरकार करीत असलेल्या कामाची माहिती देताना बायडेन यांनी हा खुलासा केला. दुसऱ्या जागतिक युद्धापासून आतापर्यंत असे कधी घडले नव्हते.

युद्धाच्या आघाडीवर

  • मारिउपोलमध्ये पटकी (कॉलरा)ची प्रादुर्भाव

  • मानवी दृष्टिकानातून मदत करण्याची मारिउपोलचे महापौर वादिम बायचेन्कोची ‘यूएन’कडे विनंती

  • युद्ध दीर्घकाळ चालल्यास पाश्‍चिमात्य देश पाठ फिरविण्याची युक्रेनला भीती

  • नागरिकांना युक्रेनबाहेर पडण्यासाठी व अन्य मदत पुरविण्यासाठी वाहनचालकांची कसरत

  • लुहान्स्क आणि डोन्स्तेक प्रांतात जोरदार संघर्षामुळे शेकडो नागरिकांचे पलायन सुरूच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com