नेपाळ सीमेवरुन हिजबूलच्या दहशतवाद्यास अटक

वृत्तसंस्था
रविवार, 14 मे 2017

नसीर अहमद असे त्याचे नाव असून, यापूर्वी झालेल्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग असल्याचे एसएसबीच्या प्रवक्‍त्याने म्हटले आहे.

नवी दिल्ली - सशस्त्र सीमा दलाच्या (एसएसबी) जवानांनी आज भारत-नेपाळ सीमेवरुन हिजबूल मुजाहिद्दीनच्या एक दहशतवाद्याला अटक केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

नसीर अहमद असे त्याचे नाव असून, यापूर्वी झालेल्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग असल्याचे एसएसबीच्या प्रवक्‍त्याने म्हटले आहे. नसीर हा मूळ जम्मू आणि काश्‍मीरमधील रहिवाशी असून, तो 2003 पासून पाकिस्तानमध्ये वास्तव्यास आहे.

संघटनेच्या म्होरक्‍याने त्याला दहशतवादी कारवायांच्या हेतूने भारतात पाठविल्याचे स्पष्ट झाले आहे. तो पाकिस्तानहून काठमांडू ( नेपाळ) आणि नंतर सीमेवरील सोनौली (उत्तर प्रदेश) येथे आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.

Web Title: hizbul mujahideen terrorist nasir arrested from sunauli border in maharajganj