अमेरिकेत होळीचं सेलिब्रेशन; न्यूयॉर्कमध्ये शानदार कार्यक्रमाचं आयोजन

Holi Celebration in New York, America: होळी हा सण फक्त भारतातील शहरे आणि गावांपुरता मर्यादित नाही.
Holi Celebration in New York America
Holi Celebration in New York AmericaSakal

Holi Celebration in New York, America: होळी हा रंगांचा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळी हा सण फक्त भारतातील शहरे आणि गावांपुरता मर्यादित नाही. अनेक वर्षांपासून हा दिवस भारतात आणि परदेशातही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. अमेरिकेतील न्यूयॉर्कसुद्धा होळीच्या रंगांपासून स्वतःला दूर ठेवू शकलं नाही. दरवर्षी होळीच्या दिवशी येथे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. भारतीय वंशाचे लोक न्यूयॉर्कमध्ये होळीचा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात.

Holi Celebration in New York America
Photo Gallery: होळीत भांग लय झाली? या घरगुती उपायांनी उतरवा हँगओव्हर

होळीच्या दिवशी या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे-

यंदाही होळीच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये अनेक विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. न्यूयॉर्कस्थित एक सांस्कृतिक संस्था येथे होळीच्या दिवशी पपेट शो (बाहुल्याचा कार्यक्रम), कला उपक्रम, भारतीय नृत्य कार्यशाळा असे कार्यक्रम आयोजित करणार आहे. हा कार्यक्रम भारतातील रंगांचा सण आणि येथील समुदायांमध्ये भारतीय संस्कृतीबद्दल जागरूकता पसरविण्यासह विशेष कार्यक्रमांद्वारे होळीचा सण साजरा होणार आहे. द कल्चरल ट्री ही दक्षिण आशियातील संस्कृतीचा प्रसार करणारी संस्था न्यूयॉर्क शहरातील सांस्कृतिक केंद्र 'द सीपोर्ट'च्या सहकार्याने 19 मार्च रोजी होळीच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करणार आहे.

Holi Celebration in New York America
Holi 2022 : होळी खेळताना जपा डोळे! या पाच गोष्टी लक्षात ठेवा

कलर्स ऑफ कृष्णाज लव्ह:

कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितले की होळीच्या उत्सवात, आम्ही जीवनातील सर्वात आनंददायी सणांपैकी एकाचे रंग भरू आणि समाजाला एकत्र आणू. 'कलर्स ऑफ कृष्णाज लव्ह'मध्ये राधा आणि सुदामा यांच्यासोबत त्यांचे मित्र आणि कुटुंबियांसोबत खेळ आणि मनोरंजनपर कार्यक्रम दाखवण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com