सुट्टी घ्या रोगप्रतिकारक शक्ती सुधारा

सुट्टी घ्या रोगप्रतिकारक शक्ती सुधारा
सुट्टी घ्या रोगप्रतिकारक शक्ती सुधारा

शाळेला सुटी मिळाली की, लहान मुलांना जितका आनंद होतो तितकाच आनंद वर्कहोलीक कर्मचाऱ्यांना सरकारी सुट्टी, रजा घेतल्यावर मिळतो. हल्ली आयटी क्षेत्रात पाच दिवसांचा आठवडा केल्यामुळे दोन दिवस साप्ताहिक सुटी मिळतेच. मात्र दोन आठवडे दैनंदिन कामातून सुटी मिळाल्यास त्या कर्मचाऱ्याची रोगप्रतिकारक शक्ती सुधारत असल्याचे नुकतेच एका संशोधनातून दिसून आले आहे. या संशोधनाचे विस्तृत निष्कर्ष फ्रंटीयर इन इम्युनोलॉजीमध्ये (रोगप्रतिकारक शक्ती शास्त्र) प्रकाशित आले आहेत.

लंडन येथील क्‍वीन मेरी विद्‌यापीठात झालेल्या एका संशोधनातून काही महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत. यासाठी संशोधकांनी उंदराला दोन वेगवेगळ्या वातावरणात ठेवून त्याचे निरिक्षण केले. दोन आठवडे त्याला घर बनविण्यासाठी साहित्य दिले आणि त्यानंतर दोन आठवडे निसर्गाच्या सान्निध्यात ठेवले. यातून उंदराच्या शरीरातील पांढऱ्या पेशींसारख्या "टी-सेल‘चे प्रमाण आश्‍चर्यकारक बदलले. रोगप्रतिकारक शक्ती निर्मिती प्रक्रियेत या पेशी महत्वाच्या असतात. या संशाधनातील हा पहिला आणि महत्वाचा पुरावा संशोधकांच्या हाती लागला आहे. आपल्या बाह्य वातावरणातून होणाऱ्या रोगांपासून, संधीवातासारख्या व्याधी, एचआयव्हीसारख्या रुग्णांना रोगप्रिकारकशक्तीमध्ये वाढ होणे आवश्‍यक असते.

या संदर्भात क्वीन विद्यापीठातील संशोधक फुल्व्हिओ डी ऍक्‍युस्टो म्हणाले,"" या संशोधनाचे निष्कर्ष जास्त विश्‍वासार्ह आहेत कारण यांत कोणत्याही औषधाचा वापर केलेला नाही. हे सर्व बदल घरगुती आणि पर्यावरणाच्या पोषक वातावरणात स्वाभाविक पध्दतीने केले आहे. अर्थातच प्रत्येक माणसावर अजून याचे संशोधन सुरू असून मनुष्याच्या मानसिक आणि शाररिक आरोग्यात सकारात्मक आरोग्यासाठी डॉक्‍टरांनी औषधाऐवजी दोन आठवडे पर्यावरणाच्या सानिध्यात व्यतित करण्याचा सल्ला दिल्यास रुग्णांना जास्त फायदा होईल. बहुतांश प्रयोगशील डॉक्‍टर हे आपल्या रुग्णाच्या आजूबाजूचे वातावरण आनंदी पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी प्रयत्न करतात.

तज्ज्ञ म्हणतात,"" प्रत्येक संस्थेने,कंपनीने त्यांच्या नियमांनुसार 21 दिवसांची हक्काची रजा असते. यापैकी कर्मचाऱ्याला सलग दहा ते पंधरा दिवस सुटी देणे शक्‍य आहे. हल्ली बरेच कर्मचारी या सुट्‌टया ऍडजेस्ट करून आपल्या कुटुंबासह पर्यटनाला जातात. मात्र वारंवार अशी सुटी देणे सबंधित संस्थेला शक्‍य असेलच असे नाही. काही कर्मचाऱ्यांच्या वर्षाअखेरीला वीस दिवस रजा शिल्लक राहतात त्यावेळी मनुष्यबळ विकास विभागाचा हा प्रयत्न असतो की, त्यांनी या सुट्ट्यांचा वापर करून तो वेळ कुटुंबासोबत व्यतित करावा.

याशिवाय मनुष्यबळ विकास विभाग कर्मचाऱ्यांसाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त दिवस बऱ्याच ऍक्‍टिव्हिटींचे नियोजन करू शकते. यामध्ये वेलनेस, काउंसिलिंग, भावभावनांचे व्यवस्थापन कसे कराल? विचार क्षमता जास्तीत जास्त सकारात्मक कशी ठेवाल? या संदर्भात मार्गदर्शन केले जाते.
आज अनेक मल्टीनॅशनल कंपन्या त्यांच्या बजेटनुसार काही कर्मचाऱ्यांना इंटरनॅशनल टूरचे नियोजन करतात. अशा विविध उपक्रमांमुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते.‘‘
-
अपर्णा रणदिवे,
प्रॅक्‍टीकल मॅजिक ऍडव्हाजरी सर्व्हिस ऍन्ड सोल्युशन
माजी एच आर हेड
(हायपर सिटी)

भारत आज प्रचंड मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची उपलब्ध आहे. खासगी कंपन्या, संस्था, सरकारी संस्थामधील वर्कहोलीक कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी सलग दोन आठवडे सुटी देणे शक्‍य आहे का?
या विषयी आपली मते प्रतिक्रिया तसेच आमच्या या संकेतस्थळावर नोंदवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com