प्रसिद्ध अभिनेता अन् त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण; ट्विटरवरून केले जाहीर

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 मार्च 2020

सामान्य नागरिकांपासून ते अगदी सेलिब्रेटींपर्यंत सर्वजण कोरोनापासून वाचण्यासाठी काळजी घेताना दिसतात. अशातच हॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याने त्याला व त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे ट्विटरवरून सांगितले आहे. 

सिडनी : जगभरात कोरोना व्हायरसचा भयंकर उद्रेक झाला असून अनेक देशांनी विमानसेवा बंद केली आहे. चीनसह ९० देश कोरोनामुळे त्रस्त असून ४ हजाराहून अधिक लोकांचा जीव कोरोनाने घेतला आहे. सामान्य नागरिकांपासून ते अगदी सेलिब्रेटींपर्यंत सर्वजण कोरोनापासून वाचण्यासाठी काळजी घेताना दिसतात. अशातच हॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याने त्याला व त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे ट्विटरवरून सांगितले आहे. 

कोरोनाचा धोका : भारताचा विदेशी पर्यटकांबाबत मोठा निर्णय; प्रवेशालाच बंदी

हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता व ऑस्कर विजेता टॉम हँक्स आणि त्याची पत्नी रिटा विल्सन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हँक्स पती-पत्नी एका चित्रपटाच्या शूटसाठी ऑस्ट्रेलियात गेले असताना त्यांना अस्वस्थ जाणवू लागले व त्यामुळे त्यांनी कोरोनाची टेस्ट केली. ही टेस्ट पॉझिटीव्ह आल्याने त्या दोघांना विलगीकरण विभागात ठेवण्यात आले आहे. 

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'सर्दी आणि अंग दुखू लगल्याने आम्हाला प्रचंड थकवा जाणवत होता. तर रिटाला थंडी वाजून ताप येत होता. त्यामुळे आम्ही रूग्णलयात जाऊन तपासणी केली असता कोरोनाचे निदान झाले. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार व नागरिकांच्या सुरक्षेसाठी आमचे विलगीकरण करण्यात आले आहे. आम्ही आमच्या तब्येतीची माहिती देतच राहू. तुम्ही तुमची काळजी घ्या...' असे टॉम हँक्सने ट्विट करून सांगितले. त्याच्या ट्विटनंतर चाहत्यांनी ते दोघं लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे. 

देशातच फिरताय ना? मग कोरोनाचं टेन्शन नको!

टॉमचा कॅप्टन फिलिप्स हा चित्रपट प्रचंड गाजला होता. तसेच टॉमने १९९३ मध्ये फिलाडेल्फिया चित्रपटासाठी, तर १९९४ मध्ये फॉरेस्ट गम्प चित्रपटासाठी ऑस्कर मिळवला होता.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hollywood Actor Tom Hanks and his wife Rita Wilson becomes Coronavirus positive