बराक ओबामा यांच्यासह अनेकांच्या घरात स्फोटके 

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि गेल्या अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या नावे पाठविलेल्या टपालातून स्फोटके असलेली दोन पाकिटे गुप्तचर संस्थेला सापडली आहेत. ओबामा यांना बुधवारी तर क्लिंटन यांना हे टपाल मंगळवारी आले होते.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि गेल्या अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या नावे पाठविलेल्या टपालातून स्फोटके असलेली दोन पाकिटे गुप्तचर संस्थेला सापडली आहेत. ओबामा यांना बुधवारी तर क्लिंटन यांना हे टपाल मंगळवारी आले होते.

असोसिएट प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार बुधवारी क्लिंटन यांच्या घरात एक वस्तू सापडली आहे. या घरात क्लिंटन दाम्पत्य राहतात. अशाच प्रकारची वस्तू अब्जाधीश जॉर्ज सोरेस यांच्या घरीही आढळून आली होती. त्याचबरोबर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या वॉशिंग्टन येथील कार्यालयातही अशीच संशयित वस्तू सापडली आहे. व्हाइट हाऊस आणि टाइम वॉर्नर सेंटरला (सीएनएन) एक संशयित पार्सल मिळाले आहे. याचाही तपास केला जात आहे. बॉम्ब सापडल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. स्कॅनिंगमध्ये ही संशयास्पद पाकिटे मिळाल्याने साहजिकच ती या दोघांपर्यंत पोहोचून होणारा संभाव्य धोका टळला.

पोलिसांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेतला असून तपास केला जात आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार क्लिंटन यांच्या ईमेलचे काम पाहणाऱ्या एका टेक्निशयनला ही वस्तू सापडली. एफबीआय आणि स्थानिक पोलिस याचा तपास करत आहेत. याप्रकरणी व्हाइट हाउसने एक निवेदन प्रसिद्ध केले असून या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. दहशतवाद्यांचे हे घृणास्पद कृत्य असल्याचे व्हाइट हाउसने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Homemade bombs sent to Obama Clinton CNN offices and Holder officials say