कपल्सचं लाडकं Honeymoon Destination असणाऱ्या मालदिवमध्ये डिवोर्सचं सर्वाधिक प्रमाण, काय आहे कारण l Honeymoon Destination Maldives Has Maximum Rate Of Divorce | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Honeymoon Destination Maldives

कपल्सचं लाडकं Honeymoon Destination असणाऱ्या मालदिवमध्ये डिवोर्सचं सर्वाधिक प्रमाण, काय आहे कारण?

Honeymoon Destination Maldives Has Maximum Rate Of Divorce : निर्सग सौंदर्याने भरलेल्या अत्यंत रोमँटिक अशा मालदिवला सर्वच कपल्सची पहिली पसंती मिळते. सुंदर समुद्र किनारा, अॅडव्हेंचर स्पोर्ट्स साठी मालदिव प्रसिद्ध आहे. नवविवाहितांचं तर खास लाडकं ठिकाण आहे हे.

पण तुम्हाला हे माहित आहे का की, मालदिव जगातला असा देश आहे जिथे सर्वाधिक घटस्फोट होतात. हे आताचं नसून अनेक दशकांपासून आहे. वर्ष २००० मध्ये इथे साधारण ४ हजार लग्न झाले त्यापैकी २ हजार जोडप्यांचे घटस्फोट झाले होते.

समुद्री प्रवास करणाऱ्यांचे प्रोत्साहन

द्वीपांवर लग्न करणं सोपं असतं. द्वीप लहान असल्याने भेटीगाठीही होत असतात. इथल्या स्त्रिया आकर्षक असतात. पण विचित्र बाब म्हणजे इथले मासेमार पुरुष अनेक महिन्यांसाठी समुद्र यात्रेवर निघून जातात आणि दुसऱ्या बेटावर सेटलही होतात. अशा परिस्थितीत ते जाताना बायकोला घटस्फोट देऊन जातात, जेणे करून ती तिचं आयुष्य जगू शकेल. ही टेंपररी सोय असते. लग्न करतात आणि समुद्र प्रवासाला जाताना घटस्फोट घेतात.

सर्वाधिक प्रमाण

ही परिस्थिती अनेक दशकांपासून अशीच आहे. हिंद महासागरातल्या या लहानशा देशात घटस्फोटाचं प्रमाण सर्वाधिक आहे. ग्लोबल डिवोर्स स्टॅटेस्टिक्सनुसार मालदिव मध्ये प्रत्येक हजार लग्नांमागे ५.५२ टक्के घटस्फोटाचं प्रमाण आहे. हा आकडा अमेरिका, कॅनडा अशा कोणत्याही आधुनिक देशांपेक्षा खूप जास्त आहे.

९० च्या दशकात इथे लग्न आणि घटस्फोट दोन्हीचे प्रमाण जास्त होते. तेव्हा हजार प्रौढांमागे ३४.४ टक्के प्रौढ लग्न करत असे. उपलब्ध माहितीनुसार १९७७मध्ये ३० वर्ष वय असणाऱ्या महिलांचा तीन वेळा घटस्फोट झालेला असे. याच्या कारणांचा शोध घेतल्यावर सामाजिक शास्त्रज्ञांना यामागे अनेक कारणं आढळली.

अनिश्चितते राहण्याची इच्छा नाही

गेल डिजिटल स्कॉलर लॅबमध्ये प्रसिद्ध क्रॉनिकल वर्ल्डमार्क एनसायक्लोपिडिया ऑफ रिलीजियस प्रॅक्टिसेज मध्ये लेखक आयजॅक हॅनरी व्हिक्टरच्या मतानुसार बहुतांश इस्लामिक देशांच्या तुलनेत मालदीवमध्ये घटस्फोटाचं प्रमाण जास्त आहे, याचं कारण म्हणजे हे लोक समुद्र प्रवास जास्त करतात. ते कधी परतणार माहित नसते, शिवाय परत आल्यावर त्याच जोडिदारासोबत राहतील हेपण निश्चित नसल्याने घटस्फोट दिले जातात.

गिनीजबुकमध्ये नोंद

सर्वाधिक घटस्फोटांच्या प्रमाणासाठी गिनीज बुकमध्ये सुद्धा याची नोंद झाली आहे. पण असा कोणताही स्टडी सापडत नाही जो यामागचे नेमके कारण सांगू शकेल. बहुतेक ठिकाणी हाच उल्लेख आढळतो की, इस्लामिक नियम आणि शरिया कानूननुसार घटस्फोट देणं सोप आहे. पण मागील काही वर्षात सरकारने घटस्फोटाचा दर नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. या अंतर्गत जे पती कोर्टात गेल्याशिवायच पत्नीला घटस्फोट देतात, त्यांना मोठा दंड भरावा लागतो.

लग्न करणेही सोपे

भारत किंवा अन्य देशांप्रमाणे इथले लोक लग्नासाठी भरमसाठ खर्च करत नाहीत. वर वधूला एक लहानशी रक्कम देण्याचं वचन देतो. यानंतर जवळच्या नातेवाईकांसोबत एक चहा पार्टी होते. पण लग्नाची ही पद्धत फक्त स्थानिक लोकांमध्ये आहे. उलट मालदिव ट्रॅव्हल प्रमोट करणाऱ्या कंपन्या मात्र लग्न लावण्याचे भरपूर खर्चिक पॅकेज सांगतात.