आण्विक ध्येये प्राप्त करूच: किम-जोंग-ऊन

वृत्तसंस्था
रविवार, 17 सप्टेंबर 2017

उ. कोरियाचे हुकूमशहा यांचा निर्धार

हॉंगकॉंग: उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम-जोंग-ऊन यांनी आमचा देश अमेरिकेच्या लष्करी ताकदीस शह देण्यासाठी निर्धारित आण्विक ध्येये प्राप्त करेल, असे म्हटले आहे. उत्तर कोरियाच्या ताज्या क्षेपणास्त्र चाचणीच्या पार्श्‍वभूमीवर किम-जोंग- ऊन यांनी हे वक्तव्य केल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाच्या चिंता आणखी वाढल्या आहेत. उ. कोरियाने नुकतेच डागलेले क्षेपणास्त्र हे थेट जपानवरून गेले होते. या क्षेपणास्त्र चाचण्यांना लगाम घालण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने उत्तर कोरियावर निर्बंध लादले आहेत.

याबाबत किम म्हणाले, की ""अतिराष्ट्रवादी महासत्तांनी घातलेले निर्बंध आणि मर्यादांचे अडथळे पार करत आमची वाटचाल ही आण्विक ध्येयाच्या दिशेने सुरू आहे. आम्हाला अमेरिकेच्या तोडीस तोड ताकद निर्माण करायची आहे, यामुळे अमेरिकी सत्ताधीश उत्तर कोरियाबाबत लष्करी कारवाईच्या वल्गना करण्याचे धाडस करणार नाहीत.''

प्रभावी अण्वस्त्रांची निर्मिती
उत्तर कोरियाला दीर्घपल्ल्याची मारक क्षमता असणाऱ्या अण्वस्त्रांची निर्मिती करायची आहे. यासाठीच हा देश वेळोवेळी चाचण्या घेताना दिसतो. याचवर्षी 3 सप्टेंबर रोजी उ. कोरियाने घेतलेल्या हायड्रोजन बॉंबच्या चाचणीचे धक्के जगभर जाणवले होते. सोव्हिएत रशियाने ज्याप्रमाणे दशकभराच्या अवधीत स्कूड क्षेपणास्त्र तयार केले होते, त्याच धर्तीवर उ. कोरिया आपली ताकद वाढवत आहे.

"यूएन'कडूनही दखल
उ. कोरियाने हायड्रोजन बॉंबची चाचणी घेतल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षाविषयक परिषदेने तातडीने आपत्कालीन बैठक बोलावत याचा निषेध केला होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही गरज पडलीच तर अमेरिका लष्करी कारवाईचा मार्ग स्वीकारेल, असे म्हटले होते. रशियाच्या राजदूताने मात्र यावर अर्थपूर्ण चर्चेतून मार्ग निघू शकतो, असा सूर आळवला होता.

Web Title: hongcong news north korea Kim-Jong-wool: Will achieve nuclear goals